नवीन शेवे (उरण )ते प्रतिशिर्डी शिरगाव पायी पालखी दिंडी संपन्न. !! झाली साई कृपा झाली ,दिंडी प्रतिशिर्डीला निघाली!!
नवीन शेवे (उरण )ते प्रतिशिर्डी शिरगाव पायी पालखी दिंडी संपन्न.
!! झाली साई कृपा झाली ,दिंडी प्रतिशिर्डीला निघाली!!
उरण (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सुनिल ठाकूर).साला बाद प्रमाणे यावर्षी देखील श्री साई शक्ती मंडळ उरण यांच्या वतीने श्री साई बाबा पालखी दिंडी महिला व पुरुषा सह पदयात्रा गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी श्री शांतेश्वरी देवी मंदिर नवीन शेवे येथून सकाळी 5 वाजतां श्री साई बाबांची काकड आरती करून पद यात्रेला सुरवात झाली होती .श्रींची पालखी दिंडी 15 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजतां मध्यान्ह आरती करिता श्री क्षेत्र प्रति शिर्डी येथे आरती करिता पोहचली.
पायी पालखी दिंधी चे गुरुवारी प्रतिशिडी कडे प्रस्थान झाले .यावेळी पायी पालखी चे जागो जागी भव्य स्वागत झाले .यामध्ये दास्तान फाटा येथे समाधान माळी , जासइ येथे मृत्युंजय म्हात्रे यांच्या कुटुंबातर्फे गव्हाण फाटा येथे साई देवस्थान साई नगर वहाल तर्फेश्री रवीशेठ पाटील ,बंबावी पाडा येथे सागर
मढवी तसेच अजिवली येथे परशुराम माळी ,तसेच कामशेत येथे माऊली शिंदे यांच्या तर्फे दिंडीचे भव्य स्वागत करून अन्नदान करण्यात आले .
पायी पालखी दिंडी रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी मध्यान्ह आरती करिता श्री क्षेत्र प्रति शिर्डी येथे पोहचल्यावर पायी पालखी दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले .
पायी पालखी दिंडी सांगता प्रीत्यर्थ सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी श्री शांतेश्वरी देवी मंदिर नविन् शेवे येथे श्री सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन् करण्यात आले आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महा प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीसाई शक्ती मंडळ उरण विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत