Contact Banner

नागपूर येथील भ्रातृ मंडळ तर्फे पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न

 

Book-release-ceremony-by-fraternal-mandal-at-Nagpur-will-be-done-on-Monday-in-the-presence-of-dignitaries

नागपूर येथील भ्रातृ मंडळ तर्फे पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न

लेवाजगत न्यूज सावदा -नागपूर येथील भ्रातृ मंडळ तर्फे पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी सकाळी १०वाजता  सुप्रसिद्ध इतिहासकार डॉ. नि. रा. पाटील व सौ. ऊर्मिला पाटील लिखित "खानदेश वऱ्हाडातील-लेवा पाटीदार समाज: एक अन्वयार्थ" आणि सौ. अलका बोंडे लिखित "रेशीमबंध" या पुस्तकांचे प्रकाशन मा. डॉ. डी. एन. पाटील अध्यक्ष भ्रातृ मंडळ, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.  सुरेश दामु भोळे (राजु मामा) विधानसभा सदस्य, जळगाव शहर यांच्या शुभहस्ते आणि प्रा. डॉ. रमाकांत कोलते, प्रा. डॉ. राम नेमाडे, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे,  डॉ. प्रमोद महाजन,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कै. लक्ष्मीबाई पाटील स्मृती सभागृहात संपन्न होणार आहे.या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास आपण अवश्य उपस्थित रहावे  असे अध्यक्ष  बी.एन. पाटील, उपाध्यक्ष उध्दव मा. नारखेडे यांनी समाज बांधवांना आवाहन केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.