Contact Banner

सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटूंबातील तिघांची आत्महत्या

 

सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटूंबातील तिघांची आत्महत्या

सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटूंबातील तिघांची आत्महत्या 

वृत्तसंस्था नाशिक -सातपूरच्या राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या शिराेडे कुटूंबातील तिघांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. यामध्ये पित्यासह दाेन सख्या भावाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने परिसरावर शाेककळा पसरली आहे. दरम्यान शिराेडे पिता पुत्रांनी आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब समाेर आली आहे.

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक शिरोडे (वडील, वय 55) प्रसाद शिरोडे ( मोठा मुलगा, वय 25 व राकेश शिरोडे (वय 23) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या तिघांनी एकाच घरात तीन वेगवेगळ्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. शिरोडे कुटुंबीय हे मुळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी असून गेल्या दहा वर्षांपासून ते व्यवसायानिमित्त नाशिक मध्ये आले होते. राधाकृष्ण नगर परिसरात बोलकर व्हॅली पोलीस चौकी समोर आशापुरा निवास या घरात ते राहत होते. वडील दीपक हे अशोकनगर शेवटचा बस स्टॉप येथील भाजी बाजार जवळ फळ विक्री करत होते, तर त्यांची मुले प्रसाद आणि राकेश चार चाकी वाहनांवर फळ विक्रीचा व्यवसाय करत होते.

     आर्थिक स्थिती हलाकीची असल्याने शिरोडे कुटुंबीय कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. रविवारी दुपारी दीपक शिरोडे यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे घराचा दरवाजा बंद करून पूजा करण्यासाठी त्या मंदिरात गेल्या होत्या. याचवेळी वडिलांचे दोन्ही भावांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन घरातील तिन्ही वेगवेगळ्या खोलींमध्ये पंख्याला गळफास घेत आपले जीवन संपवले. दीपक शिरोडे यांच्या पत्नी मंदिरातून घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने दरवाजाची कधी तोडून आत प्रवेश करताच त्यांना आपल्या पतीसह दोन्ही तरुण मुले गळफास घेऊन लटकल्याचे दृश्य दिसले. या घटनेमुळे त्यांनी जोरदार हंबरडा फोडला.

      आत्महत्या केलेल्या प्रसाद शिरोडे यांच्या पत्नी गर्भवती असल्याने मुंबईत माहेरी गेल्या होत्या. रविवारी सकाळीच त्यांची प्रसूती होऊन त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. आपल्या कुटुंबात लक्ष्मीचे आगमन झाल्याची वार्ता शिरोडे कुटुंबियांनी सगळीकडे पसरली होती. अशा आनंदाच्या प्रसंगातच त्यांनी कठोर निर्णय घेतला. त्यामुळे सातपूर परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.

     या घटनेनंतर पोलिसांना चिट्ठी आढळून आली असून या चिठ्ठीत कर्जबाजारीपणा व सावकारी जाचला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याचे समजते, मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.