Contact Banner

नववीची विद्यार्थिनी शाळेच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने जखमी

नववीची विद्यार्थिनी शाळेच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने जखमी


नववीची विद्यार्थिनी शाळेच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने जखमी 

लेवाजगत  न्यूज जामनेर -येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या‎ पहिल्या मजल्यावरून पडल्याने,‎ इयत्ता नववीतील विद्यार्थिनी‎ मंगळवारी गंभीर जखमी झाली.‎ जामनेर येथे खासगी रुग्णालयात‎ प्रथमोपचार केल्यानंतर, पुढील‎ उपचारासाठी विद्यार्थिनीला‎ जळगाव येथे हलवले.‎ टीना सतीश तुळसकर ही‎ विद्यार्थिनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये‎ इयत्ता नववीत शिकते. नेहमीप्रमाणे‎ मंगळवारी ती शाळेत आली.‎ शिक्षक वर्गात नसल्याने ती ११.३५‎ वाजता वर्गाबाहेर व्हरांड्यात आली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तेथून अचानक ती खाली पडल्याने‎ मोठा आवाज आला. याच वेळी‎ पोलिसांच्या सहकारी सोसायटीचे‎ मतदान शाळेत सुरू होते. त्यामुळे‎ शिक्षक आणि पोलिसांनी धाव घेत,‎ तिला तातडीने खासगी रुग्णालयात‎ दाखल केले. प्रथमोपचारानंतर‎ तिला जळगावला हलवले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ‎विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना माहिती‎ मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव‎ घेतली. या घटनेमुळे तिच्या आईला‎ भोवळ आली. विद्यार्थिनीच्या‎ कमरेला, उजव्या पायाला व हाताला‎ मार लागलेला आहे. ही घटना‎ नेमकी कशी घडली याची माहिती‎ स्पष्ट झाली नाही.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.