Contact Banner

विज्ञान प्रदर्शनातून मिळाला विदयार्थ्यांना कल्पकतेला वाव

विज्ञान प्रदर्शनातून मिळाला विदयार्थ्यांना कल्पकतेला वाव


 विज्ञान प्रदर्शनातून मिळाला विदयार्थ्यांना कल्पकतेला वाव 

लेवाजगत  न्यूज चिनावल-येथील नूतन माध्यमिक विद्यालयात ‎शिक्षण विभाग पंचायत समिती रावेर ‎यांच्या वतीने मंगळवारी आयोजित ‎तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात‎ सहा विविध गटांमधून एकूण १०२ ‎उपकरणे सादर झाली. उद्घाटन‎ संस्थेचे चेअरमन विनायक महाजन ‎ ‎ यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी ‎ ‎ संस्था सचिव गोपाळ पाटील होते.‎ प्रास्ताविक रावेरचे‎ गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे‎ यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात‎ संस्थेचे सचिव गोपाळ पाटील यांनी‎ विज्ञान प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या‎ सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ‎ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांत‎ कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन‎ विकसित होते, असे प्रतिपादन केले.‎ या विज्ञान प्रदर्शनामध्ये उच्च‎ प्राथमिक गटातून ४७, माध्यमिक व‎ उच्च माध्यमिक विभागातून ५०,‎ प्राथमिक शिक्षक गटातून ४,‎ माध्यमिक शिक्षक गटातून २,‎आदिवासी गटातून २ तर प्रयोगशाळा‎ सहाय्यक-परिचर गटातून १ अशी‎ एकूण १०६ उपकरणे ठेवली हाेती.‎ 

      नूतन माध्यमिक विद्यालयाच्या‎ प्राथमिक गटाच्या मार्गदर्शक कविता‎ नारखेडे तर माध्यमिक गटाच्या‎ मार्गदर्शक नयना ठोंबरे या होत्या.‎ दुपारी कार्यक्रमाचा समारोप झाला.‎ अध्यक्षस्थानी राज्य मुख्याध्यापक‎ महामंडळाचे अध्यक्ष जे.के. पाटील‎ तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा‎ विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष सुनील‎ वानखेडे, रावेरचे सहाय्यक गट‎ विकास अधिकारी राजेंद्र फेगडे‎ उपस्थित होते. यावेळी केंद्रप्रमुख‎ नरेंद्र चौधरी, संस्था संचालक‎ खेमचंद्र पाटील, दामोदर भंगाळे,,‎ मुख्याध्यापक एच.आर. ठाकरे,‎ उपमुख्याध्यापिका मीनल नेमाडे,‎ पर्यवेक्षक पी.एम. जावळे, शिक्षक‎ प्रतिनिधी ए.व्ही. राणे, शिक्षकेतर‎ प्रतिनिधी सिंचन नेहेते उपस्थित‎ होते.‎ विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण‎ डॉ.पी.एस. कोळी, योगिता झांबरे,.

   तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माहिती घेताना विविध मान्यवर.‎

निकाल असा :‎ उच्च प्राथमिक गट- प्रथम तोशल‎ चव्हाण, द्वितीय साईराज पाटील,‎ तृतीय पूर्वेश चौधरी, उत्तेजनार्थ‎ मनुश्री गाढे. माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक गट- प्रथम निहारिका‎ वर्मा, द्वितीय साईराज वारके, तृतीय‎ नीरज सोनार, उत्तेजनार्थ हेरल‎ महाजन. आदिवासी गट- प्रथम‎ अरीन जमादार, प्राथमिक शिक्षक‎ शैक्षणिक साहित्य गट- प्रथम प्रीती‎ महाजन, उत्तेजनार्थ हर्षदा भारंबे,‎ खिर्डी खुर्द. माध्यमिक शिक्षक‎ शैक्षणिक साहित्य गट- प्रथम नीलेश‎ पाटील, उत्तेजनार्थ आकाश पाटील.‎ प्रयोगशाळा सहाय्यक-परिचर गट-‎ प्रथम विवेक कुलकर्णी.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.