Contact Banner

सायबर कडे दोन तासात तक्रार दाखल करा.लंपास केलेले मिळाले ९९ हजार परत

Filed-a-complaint-to-cyber-within-two-hours-lost-got-99-thousand-back


 सायबर कडे दोन तासात तक्रार दाखल करा.लंपास केलेले मिळाले ९९ हजार परत 

लेवाजगत न्यूज जळगाव - उत्तर प्रदेशात बसून जळगावातील महिलेला वीज बीलाची थकबाकी असल्याचे सांगून बँकेची माहिती भरायला सांगून त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार रुपये लंपास करण्यात आले हाेते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाेन तासाच्य आत सायबर पाेलिसांत तक्रार केल्याने त्या महिलेचे पैसे गुरुवारी परत मिळाले आहेत.

  इवनीत काैर यांना गेल्या आठवड्यात अनाेळखी व्यक्तीचा फाेन आला. त्याने ‘महावितरणच्या मुख्य कार्यालयातून बाेलत आहे. तुमचे वीज बील बाकी आहे. जर तुम्ही लगेच ऑनलाइन बील भरले नाही तर तुमची वीज आता लगेच कट करण्यात येईल’ असे सांगितले. त्यासाठी बनावट बील पेमेंटची लिंक पाठवली. त्यात काैर यांना त्यांच्या बँकेच्या डिटेल्स भरण्यास सांगून ऑनलाइन पेमेंट भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी डिटेल्स दिल्यावर त्यांच्या अॅक्सीस बँकेच्या खात्यातून ९९ हजार रुपये कपात झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. त्यानंतर कौर यांनी लगेच सायबर पोलिसांत धाव घेतली.

     रिझर्व्ह बँकेचा नियम असा

कौर यांनी लगेच जळगाव सायबर पाेलिस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार केली. फसवणूक झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार २ तासाच्या आत तक्रार करणे आवश्यक असते. तसे केल्याने ट्रान्स्फर झालेली रक्कम राेखून ठेवता येते. त्याला उशीर झाला तर पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते, असे सायबर शाखेचे पाेलिस निरीक्षक लिलाधर कानडे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.