आते बहिणीनेच मामेभावाच्या घरातून लांबवले १२ लाख ,१६ महिन्यानंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात
आते बहिणीनेच मामेभावाच्या घरातून लांबवले १२ लाख ,१६ महिन्यानंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वृत्तसंस्था जळगाव -पहूर येथील व्यापारी अनिल कोटेचा यांच्याकडे २०२१मध्ये १२ लाखांची चोरी झाली होती. एलसीबीने या प्रकरणात जळगाव येथील पाच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. यात विशेष म्हणजे अनिल कोटेचा या मामे भावाच्या घरी चोरी करणारी महिला त्यांचीच आतेबहीण असल्याचे समोर आले आहे. पहूर येथील व्यापारी अनिल कोटेचा हे परिवारासह २५ ते २९ ऑगस्ट २०२१च्या दरम्यान घर बंद करून बाहेरगावी गेले होते. या दरम्यान त्यांच्या घरातून रोख २ लाख रुपये व १० लाख ६० हजार रुपये किमतीचे सोने चोरी गेल्याची घटना घडली होती.
या वेळी स्थानिक पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने संयुक्त तपास सुरूच ठेवला होता. १६ महिन्यांनंतर एलसीबीच्या पथकातील पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात पथकाने जळगाव येथून सय्यद सरजील हरून, अनिल रमेश चौधरी, सय्यद अराफत सय्यद फारुख, सय्यद अमीन उर्फ बुलेट सय्यद फारुख व भावना जवाहरलाल लोढा (सर्व रा. जळगाव) यांना बुधवारी ताब्यात घेतले. या सर्वांना काेर्टाने ५ दिवसांची काेठडी सुनावली असून एक संशयित फरार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत