Contact Banner

मसाकाच्या अवैद्य वृक्ष तोडीची अजूनही चौकशी का नाही ?तर कार्यवाही कधी होणार

 

MSSK-uncured-tree-felling-is-still-inquiry-why-not-if-when-action-wi

मसाकाच्या अवैद्य वृक्ष तोडीची अजूनही चौकशी का नाही ?तर कार्यवाही कधी होणार 

लेवाजगत न्यूज यावल -तालुक्यातील फैजपूर जवळील‎ मधुकर सहकारी साखर‎ कारखान्याच्या आवारातील अनेक‎ झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात‎ आली. याबाबत तक्रार करूनही‎ अजून चौकशी, कारवाई झालेली‎ नाही. याबाबत फैजपूरच्या माजी‎ नगराध्यक्षांसह शिवसेना, राष्ट्रवादी‎ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी‎ मंगळवारी तहसीलदारांची भेट‎ घेतली.‎ फैजपूरजवळील मधुकर‎ सहकारी साखर कारखाना जिल्हा‎ बँकेने थकीत कर्जापोटी विक्री केला‎ होता. या विक्रीनंतर संबंधित‎ खरेदीदाराने कारखान्याच्या‎ आवारातील सुमारे ४० वर्षे‎ वाढलेली हिरवेगार झाडे तोडली. हा‎ प्रकार कारखान्यात आंदोलन‎ करताना शेतकरी तथा राष्ट्रवादी‎ काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस‎ विजय प्रेमचंद पाटील व भाजपचे‎ युवा जिल्हा सरचिटणीस राकेश‎ फेगडे यांच्या निदर्शनास आला.‎ यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी‎ प्रांताधिकारी कैलास कडलग,‎ तहसीलदार महेश पवार आणि वन‎ विभागाचे (पूर्व) वनक्षेत्र अधिकारी‎ विक्रम पदमोर यांच्याकडे‎ निवेदनातून तक्रार केली. मात्र,‎ अद्यापही या प्रकरणी कोणतीही‎ कारवाई झालेली नाही. 

     त्यामुळे‎ फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश‎ राणे, शिवसेनेचे मुन्ना पाटील व‎ काँग्रेसचे पदाधिकारी तथा नावरे‎ माजी सरपंच समाधान पाटील,‎ ललित चौधरी यांनी मंगळवारी‎ तहसीलदार महेश पवार यांची भेट‎ घेतली. वृक्षतोडीची चौकशी व‎ कारवाईची मागणी केली. दरम्यान,‎ राज्याच्या हिवाळी अधिवेशनात‎ मसाकाच्या विक्री प्रक्रियेला राज्य‎ सरकारने स्थगिती देण्याची घोषणा‎ केली. यानंतर कधी साखर निर्यात‎ कोटा, तर कधी वृक्षतोड या‎ मुद्द्यावर मसाका चर्चेत आहे.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.