खारघर भाजपच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांचा निषेध
खारघर भाजपच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांचा निषेध
लेवाजगत न्यूज उरण प्रतिनिधी सुनिल ठाकूर-नागपूर विधिमंडळ अधिवेशनात भर सभागृहात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा खारघर भाजपाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबाबत अनुद्गार काढणे हे चुकीचे असून या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, लवकरात लवकर त्यांनी देशाची व जनतेची माफी मागावी अन्यथा यापुढे उग्र निषेध केला जाईल असा इशारा दिला.
छत्रपती संभाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास वारंवार पुसण्याचे आणि बदलण्याचे काम होत असून आम्ही तसे करणा-यांचा निषेध नोंदवतो अशी संतप्त प्रतिक्रिया पनवेल महामगरपालिकेचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढलेले उद्गार अवमानकारक असल्याचा आरोप करत खारघर भाजपने खारघर रेल्वे स्टेशन जवळ निषेध आंदोलन केले.
ह्याप्रसंगी अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या सोबत मा. नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजीभाई बेरा, ऍड. नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, गुरु गायकर, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, उपाध्यक्ष दिलीप जाधव,उपाध्यक्ष रमेश खड़कर, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, सोशल मीडिया सहसंयोजिका मोना आडवाणी,महिला सरचिटणीस साधना पवार, कांचन बिरला, शोभा मिश्रा,सुशीला शर्मा,निर्मला यादव, जलपा शास्त्री, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर बांगर, प्रभाग 5 अध्यक्ष वासुदेव पाटील, प्रभाग-3 अध्यक्ष मुनाफ पटेल, अनिता जाधव,विनोद ठाकूर,भरत कोंढाळकर, काशिनाथ घरत, संतोष शर्मा,ज्येष्ठ नागरिक सेलचे संयोजक नवनीत मारू, संजय शर्मा, आनंदा मोकाशी, उत्तर भारतीय सेल सह संयोजक शैलेन्द्र त्रिपाठी,अध्यात्मिक सेलचे संयोजक नवलकुमार मोरे, योगिन्द्रम कोट्टरी, पवित्रा कोट्टरी, व्यापारी सेलचे सहसंयोजक अशोक जांगिड़, दिलीप आड़े, प्रवीण बेरा इ. कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत