Contact Banner

नोवा सन फार्मा केम कंपनीत आग मोठे नुकसान; तारापूर एमआयडीसीतील घटना

 

नोवा सन फार्मा केम कंपनीत आग मोठे नुकसान; तारापूर एमआयडीसीतील घटना

नोवा सन फार्मा केम कंपनीत आग मोठे नुकसान; तारापूर एमआयडीसीतील घटना 

लेवाजगत न्यूज  बोईसर - तारापुर एमआयडीसी परिसरातील नोवा सन फार्मा केम कंपनीत मंगळवारी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ०६ मधील नोवा सन फार्मा केम कंपनीत मंगळवारी नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये डिस्टिलेशन प्लांट बेंजो क्लोराइड नामक रसायनाचे डिस्टिलेशन सुरू असताना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यानंतर काही क्षणातच आगीचे रौद्ररुप धारण केल्याने सर्वांची धावपळ सुरु झाली. उपस्थित मजुरांच्या सहराय्याने कंपनीत असलेल्या पाण्याच्या वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच काही वेळातच एमआयडीसीतील अग्निशामक दलाच्या तीन बंबास पाचारण करण्यात आले होते. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असून डिस्टिलेशन प्लांटचा वीजपुरवठा करणाऱ्या तारामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.