Contact Banner

कारने जाणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक करणाऱ्या पोलिसांचे होतेय कौतुक

खंडणी प्रकरणी दोघे अटकेत By जितेंद्र कोतवाल  On Jan 12, 2023  Share यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दत्तक पत्र व नावे केलेले शेत जमिनीचे कागदपत्र खोटे बनविण्याचे सांगत एक लाख रूपयांची मागणी केल्यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे.  या संदर्भात मिळालेली माहीती अशी की ,येथील शहरातील पूर्णवाद नगरातील रहिवासी इरफान इस्माईल तडवी यांच्या पत्नीचे दत्तक प्रकरण व तिचे नावे दत्तक वडिलांनी करून दिलेले शेतीचे प्रकरण खोटे व गंभीर असल्याचे सांगत व ते प्रकरण दाबण्यासाठी येथील सुरेश पाटील व विरावली येथील संजय उत्तम पाटील एक लाख रुपयाची खंडणी मागितल्याची फिर्यादी इस्माईल तडवी यांनी दिलेल्या दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे  याबाबत येथील पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येथील पूर्णवाद नगरातील रहिवासी इरफान इस्माईल तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माझी पत्नी परविन हिस सुभान अमीर तडवी यांना मुलगा नसल्याने त्यांच्या साळूची मुलगी तथा माझी पत्नी परविन हिस दत्तक घेतले त्यानंतर बर्‍याच वर्षानंतर त्यांनी ३०जुलै २१ रोजी तहसीलदार यांचे कार्यालयात त्यांची यावल शिवारातील शेत गट नंबर २२८३ क्षेत्र दोन हेक्टर ०२आर ही सुभान तडवी यांचे नावे असलेली शेत जमीन त्यांची दत्तक मुलगी तथा माझी पत्नी परविन हीस नातेवाईक व पंच मंडळी समक्ष दत्तक घेत तहसीलदार यांचे कडे अधिनियम १९६६ ते कलम ८५ नुसार नुसार कुटुंब वाटणी पत्र तयार केले व परविन हिस ७/१२ मध्ये समाविष्ट केले. १ जानेवारी २३ रोजी, आठ वाजेचे सुमारास इरफान तडवी यांचा मोबाईल फोन क्रमांक ९८९००३८१३७ वर येथील संजय उत्तम पाटील यांचे यावल येथे असलेले मोटर गॅरेज वर गॅरेज चालक संजय पाटील व पत्रकार सुरेश पाटील यांनी इरफान तडवी यांना बोलावले.  तुझ्या पत्नीचे दत्तक प्रकरण व शेतजमिनीचे प्रकरण माहीत झाले आहे , हे प्रकरण मी बाहेर काढेल असे सुरेश पाटील यांनी सांगत तुझ्या पत्नीला ,सासर्‍याला ,व तहसीलदार यांना महागात पडेल हे प्रकरण दाबण्यासाठी एक जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान वेळोवेळी मोबाईलवर फोन करून एक लाख रुपयाची मागणी केली एकदम एक लाख रुपये जमत नसतील अन्यथा बातमी छापून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली आहे अशा आशयाच्या फिर्यादीवरून येथील पत्रकार सुरेश पाटील व संजय उत्तम पाटील यांची विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  दरम्यान, या संदर्भात सुरेश पाटील म्हणाले की, दत्तक प्रकरण व शेतीचे प्रकरणाची माहिती माहिती अधिकारात मागितल्याने इरफान तडवी यांना रा आल्याने ही फिर्याद दाखल केली आहे.


कारने जाणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक करणाऱ्या पोलिसांचे होतेय कौतुक 

लेवाजगत  न्यूज अमळनेर -बनावट नंबरच्या कारमधून‎ दरोड्याच्या उद्देशाने जाणाऱ्या‎ चाैघांच्या मुसक्या पोलिसांनी‎ आवळल्या आहेत. हे पाचही जण‎ मालेगावचे रहिवासी असून‎ त्यांच्याकडून कारसह सुऱ्या, चाकू,‎ टॉमी जप्त केल्या आहेत. शहरातील‎ अमळनेर ते चोपडा रोडवरील‎ गजानन महाराज मंदिरासमोरील‎ रोडवर ११ रोजी रात्री ३.३० वाजेच्या‎ सुमारास ही कारवाई केली.‎ सहाय्यक फौजदार बापू साळुंखे‎ व चंद्रकांत पाटील रात्री गस्त घालत‎ हाेते. या वेळी अमळनेर ते चोपडा‎ रस्त्यावर इंडिगो (एमएच- १९,‎ एव्ही- ५३६२) या चारचाकीला‎ दुचाकीची बनावट नंबरप्लेट लावून‎ चालकासह एकूण चार व्यक्ती जात‎ हाेते. संशय आल्याने बापू साळुंखे‎ यांनी कार थांबवून चालकाची‎ चाैकशी केली असता त्याने साहील‎ शेख सुलेमान (वय २२, रा.‎ मालेगाव, विजयनगर, कुसुंबा रोड)‎ असे नाव, गाव सांगितले. तर‎ त्याच्यासोबत मालेगाव येथील‎ खालीद शहा मेहमूद शहा (वय २१,‎ रा. रमजानपुरा), इसरार खान‎ जमशेर खान (वय २३, रा.‎ निहालनगर) व फिरोज शेख मुसा‎ (वय २४, रा. साहिल नगर) गाडीत‎ होते. 

       त्यांना विचारल्यानंतर त्यांनी‎ जळगाव जात असल्याचे सांगितले.‎ परंतु, ते चोपडा रस्त्याने जात‎ असल्याने पाेलिसांचा संशय‎ बळावला. त्यामुळे बापू साळुंखे‎ यांनी कारची पाहणी केली असता‎ कारच्या पुढील बाजूस नंबर प्लेट‎ नव्हती. परंतु, मागील बाजूस‎ एमएच- १९ एव्ही- ५३६२ या‎ क्रमांकाची नंबर प्लेट होती.‎ मोबाइलवरील वाहन अॅप्सवर हा‎ क्रमांक टाकून खात्री केली असता‎ ताे नंबर दुचाकीचा असल्याचे स्पष्ट‎ झाले. त्यानंतर कारच्या डिक्कीत‎ एमएच- १५, बीएक्स- ०४७५ हा‎ नंबर असलेल्या चार नंबरप्लेट, २‎ टाॅमी, चाकू मिळाला. या चाैघांना‎ अटक केली आहे.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.