एक गरज जळगाव/भुसावळ ते पुणे special रेलवेची ( रेल्वे)-(खान्देश Express)
एक गरज जळगाव/भुसावळ ते पुणे special रेलवेची ( रेल्वे)-(खान्देश Express)
लेवाजगत न्यूज जळगाव -जिल्ह्यातील नागरीकांची कित्येक वर्षांची मागणी असलेली भुसावळ(खान्देश) ते पुणे एक्सप्रेस अजूनही सुरु झालेली नाही . (खान्देश Express) दररोज लोक आपला जीव मुठीत घेऊन खासगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करतात . का? सगळ्याच खासगी ट्रॅव्हल बसेस खराब आहेत असे मला म्हणायचे नाही. काही चांगले operators देखील आहेत . ऊलट जरा क्षणभर विचार केला की जर या खासगी ट्रॅव्हल बसेस नसत्या तर दररोज एवढ्या मोठ्या संख्येने खान्देशातील लोकांनी पुण्यासाठी कसा प्रवास केला असता . मी या लेखातून सर्व operators ला धन्यवाद देतो . कारण खासगी प्रवासी गाड्यांची वेळ सर्वांच्या सोयीची आहे . खासगी ट्रॅव्हल्स च्या बसेस सांयकाळी ८ ते ११ या वेळेत पुणे व जळगाव / भुसावळ येथून सुटतात व पहाटे लवकर लोकांना पुण्याला किँवा जळगाव/भुसावळ येथे सोडतात . अशी कुठलीही ट्रेन आज रोजी उपलब्ध नाही . जे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला समजते ते सेंट्रल रेल्वेचे अधिकारी /राज्य सरकार / केंद्र सरकार /जळगावचे आजी/ माजी /विद्यमान आमदार , खासदार, सर्व दादा आणी भाऊ यांना कळत नसेल असे मला मुळीच वाटत नाही! सगळयांना कळते पण वळत नाही . यामागे काहीतरी अर्थकारण / राजकारण यांचे पाणी मुरत आहे हे नककीच ? आज खान्देशातील प्रत्येक कुटूंबातील मुले /मुली पुणे -मुंबई येथे कामाच्या शोधात जातात व जॉब मिळाल्यावर तिथेच स्थायिक होतात . मग त्यांचे कुटूंबिय पुणे -मुंबई येथे कामाच्या निमित्ताने जाण्यास सुरुवात करतात . यामुळे प्रवाशी संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . कारण खान्देशात गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन गुंतवणूक झालेली नाही. याला जबाबदार कोण हा देखील संशोधनाचाच भाग आहे . तरी हा लेख लिहिण्याचा माझा उद्देश हाच आहे की जळगाव / भुसावळ येथून दररोज रात्री ८-९ दरम्यान एक थर्ड ac ट्रेन सुरु करावी व तशीच ट्रेन पुण्याहून देखील जळगाव / भुसावळ साठी सुरु करावी . हि ट्रेन सकाळी ५:३० ते ६ च्या दरम्यान जर नागरिकांना पुणे येथे किँवा जळगाव / भुसावळ येथे सोडणार असेल तरच तीला मोठा प्रतिसाद मिळेल अशि मागणी चंद्रकांत चौधरी पुणे, जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांनी केलि आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत