वाढत्या कौटूंबिक दुराव्यामुळे वधुवर मेळावे आवश्यक ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी
वाढत्या कौटूंबिक दुराव्यामुळे वधुवर मेळावे आवश्यक- ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी
लेवाजगत न्यूज नाशिक -भावी वधूवर निवडतांना जास्त अपेक्षा करणे व्यर्थ. त्यापेक्षा माणसं कशी आहेत, हेच पाहणे महत्त्वाचे. वाढत्या कौटुंबिक गरजा, त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ताणतणाव कौटुंबिक दुराव्यामुळे वधूवर पालक परिचय मेळावा ठिकठिकाणी आयोजित होणे आता आवश्यक बाब बनली असल्याचे प्रतिपादन नाशिकरोड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी केले.
जेलरोड, दसक येथे नाशिकरोड ब्राह्मण सभा, संस्थेच्या मुख्य कार्यालयात वधूवर पालक (सर्व शाखीय) परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थान मुकुंद कुलकर्णी यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष सुभाष सबनीस, कार्यवाह दत्ता कुलकर्णी, के. पी. कुलकर्णी, समिती प्रमुख सुरेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष राजीव व्यवहारे आदी उपस्थित होते.
मुलगी घर सांभाळणारी हवी
प्रारंभी श्रीगणेश वंदना, गुरू वंदना होऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मुकुंद कुलकर्णी यांनी संस्थेचे कार्य विषद करून परिचय मेळाव्यात भावी वधूवर निवडतांना विचारांशी सहमत असतील, असेच पाहावे. मुलगा कर्तृत्ववान हवा, मुलगी घर सांभाळून घेणारी हवी, एवढेच पाहावे. जीवनात आशावादी, सकारात्मक विचार ठेऊन जे जे आपल्याला चांगले समाजाला अर्पण करता येईल, याचाच विचार करावा. आर्थिक परिस्थिती बरी, पण मानसिक स्थिती खराब, ही विषमता दूर करणे हितावह.
परिचय मेळाव्यात महाराष्ट्रातून अनेक विवाहच्छुक वधूवर, त्यांचे पालक उपस्थित राहून त्यांनी स्वतः चा परिचय करून दिला. दुपारी सर्व समाज बांधवांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी दिनेशपंत ठोंबरे यांची निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान झाला. आभार दत्ता कुलकर्णी यांनी मानले. यावेळी मंदाकिनी शेरीकर, शोभना व्यवहारे, दिपाली भिंगारकर, डॉ शुभांगी रत्नपारखी, मंजुषा ताथोडे, सुनंदा कुलकर्णी, वैशाली कानडे आदी महिला सभासदांनी मेळावा यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.
याप्रसंगी दिलीप भिंगारकर, जयंतराव देशपांडे, अमृता करजगिकर, अंकित कुलकर्णी, शिल्पा नाईक, विजय मुंगी, माधव पोळ, दिलीप रत्नपारखी, प्रकाश कुलकर्णी, जयंत फडके, सरोज फडके, वैभव थिटे, अपूर्व लेले, प्रकाश जोशी, नेहा राजहंस आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत