पादाभ्यंग-डॉ.सुशांत शशिकांत पाटील
पादाभ्यंग-डॉ.सुशांत शशिकांत पाटील
लेवाजगत:-पाय हा शरीराचा अतिशय महत्वाचा अवयव आहे पायावर आपल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आयुर्वेद शास्त्रात देखील पायाला खूप महत्व आहे. आयुर्वेदात पायाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी जी मालिश केली जाते किंवा जी विधी केली जाते त्याला पादाभ्यंग असे म्हटले जाते. तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक दवाखान्यात केल्यानंतर तुम्हाला पायाची मालिश करताना आयुर्वेद औषधी सिद्ध तेलांचा उपयोग केला जातो. त्याचा उपयोग करुन अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने मालिश केली जाते. पादाभ्यंग केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत मिळते. या लेखात जाणून घेऊया पादाभ्यांगाचे फायदे.
१ )पादाभ्यंगामुळे पायांचा नसा मोकळ्या होण्यास मदत मिळते. तुमचे पाय चालून , पायांना खूप वेदना असतील तर तुम्ही पादाभ्यंग नक्कीच करायला हवे. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल
शक्य असल्यास दररोज रात्री तुम्ही पायांना तेलाने अथवा सिद्ध तुपाने मसाज करायला हवा. त्यामुळे तुम्हाला आलेला दिवसभराचा थकवा दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल.
२)तुम्हाला असलेल्या छोट्या मोठ्या आजारांपासून दूर ठेवण्याचे काम पादाभ्यंग करते.
३) तुमचे मन अशांत आणि अस्थिर असेल तर तुम्ही पादाभ्यंग करायला हवे त्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळेल.
४) तुमच्या पायांचे काही त्रास असतील तर तुम्ही नक्कीच पायांची काळजी घेण्यासाठी आणि ते त्रास कमी होण्यासाठी तुम्ही पायांना तेल लावायला हवे.
अनेकदा पायाची त्वचा ही इतर त्वचेपेक्षा अधिक शुष्क (कोरडी) असते. तेलाने / तुपाने चांगली मालिश केल्यानंतर पायांची त्वचा चांगली राहते.
५)वाताच्या त्रासामुळे ज्यांचे पाय दुखत असतील अशांनी तर अगदी हमखास पायांना तेल लावायला हवे.
६)पायांना योग्य रक्त पुरवठा करण्यासाठी ही पादाभ्यंग हे खूप चांगले आहे. ज्यांचा पायाचा रक्त पुरवठा चांगला नसेल अशांनी नक्कीच पादाभ्यंग करायला हवे.
७)खूप जणांना झोप येत नाही. तुम्हालाही पटकन झोप येत नसेल तर तुम्ही देखील चांगल्या तेलाने पायाची मालिश करायला हवी. त्यामुळे झोप पूर्ण होण्यास मदत मिळेल.
अश्या प्रकारे आठवड्यातून एक अथवा अधिक वेळा पादाभ्यंग करून घ्यावा.
डॉ.सुशांत शशिकांत पाटील आयुर्वेदाचार्य ,सर्वद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय,विद्या नगर, भुसावळ रोड,नवीन नगर पालिका जवळ,फैजपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत