सावद्याचे खेळाडू चमकले गोव्यातील क्रिकेट स्पर्धेत
सावद्याचे खेळाडू चमकले गोव्यातील क्रिकेट स्पर्धेत
लेवाजगत न्यूज सावदा-भारतीय टी-१० ओव्हर आर्म क्रिकेट महासंघ व भारतीय अंडरआर्म क्रिकेट महासंघाने आयोजित ७ वी राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा (१९ वर्षे मुले, मुली आणि खुला वयोगट) १६ जानेवारीला गोवा राज्यातील वास्को येथे पार पडल्या. पंजाब, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, तेलंगणा व गोवा राज्यांतील संघांनी त्यात सहभाग नोंदवला. त्यात महाराष्ट्राच्या संघात सावदा येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
महाराष्ट्र राज्य लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट संघात सावदा (ता. रावेर) येथील पालिका संचालित आ. गं. हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी गौरव प्रकाश जैन, महाराष्ट्र राज्य संघ कर्णधार तसेच सध्या अकरावीत विज्ञान शाखेचा विद्यार्थी खेळाडू सिद्धेश प्रशांत जैन आणि निशाद विनोद पाटील हे संघात सहभागी होते. त्यांच्या खेळीमुळे महाराष्ट्र संघाने टेनिस बॉल क्रिकेट खेळात अंतिम सामन्यात तेलंगणा राज्य संघाचा पराभव केला. २०२२-२३ या वर्षाचे प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विजेतेपद प्राप्त केले. लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात तृतीय क्रमांक पटकावला. संघाचे कोच तथा फैजपूर येथील क्रीडा प्रशिक्षक योगेश तडवी, जिल्हा टी-१० क्रिकेट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तेजस पाटील, दिव्या पाटील, योगेश चौधरीसह आदींनी कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत