Header Ads

Header ADS

समृद्धी वर उलटलेल्या ट्रॅव्हल्स मधील जखमी प्रवाशांना ट्रक ने ठोकले १ ठार सहा जखमी

समृद्धी वर उलटलेल्या ट्रॅव्हल्स मधील जखमी प्रवाशांना ट्रक ने ठोकले १ ठार


समृद्धी वर उलटलेल्या ट्रॅव्हल्स मधील जखमी प्रवाशांना ट्रक ने ठोकले १ ठार सहा जखमी

लेवाजगत न्यूज औरंगाबाद -समृद्धी महामार्गावरून औरंगाबादकडे जाणारी खासगी बस असोला शिवारात उलटली. याच वेळी एका ट्रकने तिला धडक दिली. या अपघातात एक जागीच ठार, तर २० प्रवासी जखमी झाले. ६ जण गंभीर आहेत. शुक्रवारी पहाटे ४ वाजता असोला शिवारात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ती नागपूर कॉरिडॉरवर उलटली. याच वेळी औरंगाबादहून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली.

    बसमधील प्रवासी अंकितकुमार रावेल (२८, गुजरात) जखमी अवस्थेत रस्त्यावर असताना ट्रकने त्याला चिरडले. कांता रामटेके (७५, औरंगाबाद), अनिल गवळी (२८, नागपूर), यमुना वानखेडे (६०, औरंगाबाद) यांच्यासह अन्य १५ प्रवासी जखमी झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.