सावदा परिसरात भूकंपाचे झटके
सावदा परिसरात भूकंपाचे झटके
लेवाजगत न्यूज भुसावळ : शहर व परिसरात शुक्रवारी सकाळी दहा वाजून २२ मिनिटांनी भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरीकांमध्ये खळबळ उडाली. भुसावळसह लगतच्या कंडारी,रायपुर,सावदा भागातही दहा ते वीस सेकंद हे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.परिसरात 3.3 रि स्के चे भूकंपाचे धक्के जाणवला आहे. तसेच पुढील भूकंपाचा धक्का आणखी तिव्र राहू शकतो.
हतनूर येथे या संदर्भात संपर्क साधला असता यंत्रणा बंद असल्याने नेमकी माहिती कळू शकली नाही तर भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपणाला फोन आले असून आपण वरीष्ठ स्तरावर माहिती कळवली असून नाशिक येथील मेरी संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर अधिक काही सांगता येईल, असे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत