प्रजासत्ताक दिना निमित्त स्टूडेंट लिडरशिप डेवलपमेंट प्रोग्राम मार्फत बोईसर - खैराफाटक येथे विस्थापित विद्यार्थ्यांना अंकलिपी चे वाटप
प्रजासत्ताक दिना निमित्त स्टूडेंट लिडरशिप डेवलपमेंट प्रोग्राम मार्फत बोईसर - खैराफाटक येथे विस्थापित विद्यार्थ्यांना अंकलिपी चे वाटप
उरण (लेवाजगत प्रतिनिधी सुनिल ठाकूर)प्रजासत्ताक दिना निमित्त स्टूडेंट लिडरशिप डेवलपमेंट प्रोग्राम मार्फत बोईसर - खैराफाटक येथे विस्थापित विद्यार्थ्यांना अंकलिपी चे वाटप करण्यात आले. गेले काही दिवस सदर विभागातील विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम करण्यात येत आहे. मुलांची शिकण्याची इच्छा पाहून त्यांचे पालक सुध्दा आता शिकण्याची इच्छा व्यक्त करत आहे. ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन स्टूडेंट लीडर शिप डेव्हलपमेंट प्रोग्राम चे प्रतिनिधी दिक्षा बच्चे जिज्ञा मोरे मयुर मोरे अतुल म्हात्रे वैष्णवी दवणे अलेक्स अमन जाधव मृणाल शेठ हे करत आहेत. भविष्यात ह्या सर्व विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेत दाखला मिळावा तसेच त्यांच्या आई वडिलांसाठी रात्र शाळा चालवण्याचा संकल्प घेतला आहे. भविष्यात असे लोक उपयोगी उपक्रम स्टूडेंट लिडरशिप डेवलपमेंट प्रोग्राम तर्फे पालघर विभागात राबवण्यात येतील तसेच जर कोणाला स्टूडेंट लिडरशिप डेवलपमेंट प्रोग्राम सोबत काही काम करायचे असेल तर आपण प्रोग्राम च्या प्रतिनिधींशी(जिज्ञा मोरे - +91 74989 41623) संपर्क करू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत