सावदा येथे आजपासून रात्री शिव महापुराण कथा
सावदा येथे आजपासून रात्री शिव महापुराण कथा
लेवाजगत न्यूज सावदा-दरवर्षीप्रमाणे शहरातील माळी वाडा, गवत बाजार भागात संघर्ष मित्र मंडळाने १९ ते २६ जानेवारीपर्यंत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन केले आले. साध्वी गायत्री गिरी या कथाकार होत्या परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्या ऐवजी हभप महंत गोपालनंदगिरीजी महाराज कथा वाचन करतील. गुरुवारी महात्म्य, शुक्रवारी अग्निस्तंभ प्राकृत्य, शनिवारी सती जन्म, वीरभद्र प्रागट्य, रविवारी शिवपार्वती विवाह सोमवारी कार्तिकीय जन्म, तारकासूर वध, मंगळवारी शिव अवतार वर्णन, बुधवारी शंभू निशुंभ वध असे सजीव देखावे सादर करण्यात येतील. सप्ताहात दररोज सायंकाळी ७ ते १०.३० वाजेदरम्यान ही कथा होईल. २६ जानेवारीला दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दिंडी सोहळा निघेल. कथेला उपस्थितीचे आवाहन संघर्ष मित्र मंडळाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत