Header Ads

Header ADS

बोली भाषेत साहित्य निर्मिती करावी तरच भाषेचे जतन होईल -आ शिरीषदादा चौधरी फैजपूर येथे तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन-धनाजी नाना महाविद्यालयात जल्लोषात

फैजपूर येथे तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन-धनाजी नाना महाविद्यालयात जल्लोषात  बोली भाषेत साहित्य निर्मिती करावी तरच भाषेचे जतन होईल  -आ शिरीषदादा चौधरी


 बोली भाषेत साहित्य निर्मिती करावी तरच भाषेचे जतन होईल  -आ शिरीषदादा चौधरी

फैजपूर येथे तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन-धनाजी नाना महाविद्यालयात जल्लोषात

लेवाजगत न्यूज कुसुमताई चौधरी साहित्य नगरी- फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर च्या प्रांगणात आज स्व.कुसुमताई चौधरी यांच्या स्मृती दिवस निमित्त लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले त्या प्रसंगी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नाट्यछटाकार आणि प्रवर्तक लेवागणबोली संवर्धन श्री.अरविंद हे अध्यक्ष स्थानी लाभले होते,  तसेच उद्घाटन अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध भाषा संशोधक डॉ.काशिनाथ बऱ्हाटे, अचलपूर उपस्थित होते,  प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीष चौधरी अध्यक्ष तापी परिसर विद्यामंदिर फैजपूर, प्रसिद्ध उद्योजक श्री. रत्नाकर चौधरी, महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक श्री सुबोध चौधरी, जळगावचे माजी महापौर श्री.विष्णू भाऊ भंगाळे, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, नवनियुक्त अधिसभा सदस्य एकनाथ नेहते, प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ.किशोर कोल्हे, डॉ.पद्माकर पाटील, युवा नेते धनंजय भाऊ चौधरी, तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संस्थेचे पदाधिकारी प्रा. एस. के.चौधरी, जनता शिक्षण मंडळ चे अध्यक्ष श्री. प्रभात चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.

फैजपूर येथे तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन-धनाजी नाना महाविद्यालयात जल्लोषात  बोली भाषेत साहित्य निर्मिती करावी तरच भाषेचे जतन होईल  -आ शिरीषदादा चौधरी


प्रसंगी आमदार श्री दादा चौधरी यांनी आपल्या मनोगतात भाषा संवर्धन आणि जतन एका विशिष्ट बोलीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त करा जोपर्यंत आपल्या बोलीत बोलण्याची सवय आपण लावून घेत नाही तोपर्यंत भाषेचे संवर्धन आणि ती टिकून ठेवण्याचे कार्य अपूर्णच राहील म्हणून प्रत्येक व्यक्तीने बोलीभाषेकडे डोळ्स नजरेने पाहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करात, नवीन पिढीने वाचनाची सवय लावावी तसेच बोली भाषेत साहित्य निर्मिती करावी तरच भाषेचे जतन होईल असे आवाहन केले आणि स्वर्गीय कुसुमताई चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ 5000 रुपयाचे बक्षीस लेवा गणबोली च्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या साहित्यिक अथवा कलावंतांना प्रेरणा म्हणून घोषित केले.

     उद्घाटन अध्यक्ष श्री काशिनाथ चौधरी यांनीही आपल्या भाषणात बोली भाषेचे महत्व पटवून दिले तसेच प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मंडळींना आवाहन केले की शासन दरबारी लेवागणबोली चे महत्व वाढण्यासाठी साहित्य विकास मंडळाची आवश्यकता आहे. त्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे खानदेशातील सर्व भाषांचा विकास बोलीभाषांचा संवर्धन व्हावे यासाठी बोलीभाषा विकास केंद्र स्थापना करून त्या माध्यमातून या परिसरातील बोलींचे संवर्धन करण्याचे आवाहन उपस्थित मंडळींना केले.

    उद्योजक रत्नाकर चौधरी यांनीही भाषेच्या तांत्रिक बाबींमध्ये लक्ष केंद्रित करून लिखाणासोबतच त्याचे डॉक्युमेंटेशन आणि चित्रीकरण या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून पुढील काळात समाजात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण करणारे साहित्यिक यांना आमंत्रित करून लेवागणबोली भाषेत साहित्यिक विकासाचा आराखडा तयार करावा आणि जागतिक स्तरावरील विचारांचे अनुवाद करून देवागण बोली भाषेचा विकास होईल या दृष्टीने आखणी करावी असे आवाहन केले.

    अध्यक्ष भाषणात श्री अरविंद नारखेडे यांनीही समाजातील इतर भाषिक वर्गांमध्ये जो काही वाद आहे. त्याच्यावर भाष्य करत लेवागण बोली या भाषेविषयी श्रेय लाटणाऱ्या मंडळींना चांगलेच सुनावले श्री अरविंद नारखेडे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात प्रमाण भाषेत एखादा शब्द बोली भाषेचा आढळल्यावर ज्याप्रमाणे त्या शब्दांना कमी लेखून हिणविले जाते ही प्रवृत्ती बोलीभाषांसाठी खूप मारक आहे असे सांगत अशा प्रकारच्या प्रवृत्तींना बोली भाषेतील साहित्यिकांनी आपल्या कार्यातून विविध प्रकारच्या साहित्यिक रचनेतून दाखवून दिले पाहिजे की बोलीभाषा ही खऱ्या अर्थाने साहित्यकारांची भाषा आहे. कारण बोली भाषेतला साहित्य हे त्या त्या समाजाच्या जाणिवांचे त्या त्या परिसरातील ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन करणारे साहित्य आहे म्हणून लेवागलबोली साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बोली भाषेतून साहित्य निर्माण करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त करत भविष्यात लेवागणबोलीला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आवाहन केले.

    प्रसंगी लेवागणबोलीच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणारे अनेक कलावंत लेखक यांचा सन्मान करण्यात आला त्यात प्रतिभाताई ढाके, उत्पल चौधरी, निवृत्ती नेरी,हरिभाऊ कोडे, शिवम चौधरी,,रवि वारके, भूषण ढाके, राजेंद्र जावळे, अभिनव टोंगळे, विठ्ठल भंगाळे, अजय चौधरी,विजय पाटील अ.सू.पाटील, शीतल पाटील, सुनील इंगळे इत्यादी विविध क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला.

          मानाचे पान या सदरात प्रतिष्ठित  व्यक्तींनाच्या सन्मान विषयक मानाचे पण आमदार श्री चौधरी यांच्या विषयी मानाचे पानाचे वाचन ज्योती राणे यांनी, तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद नारखेडे यांच्या मानाचे पानाचे वाचन सौ. सुवर्णालता पाटील तसेच अ.सू.पाटील यांच्या मानाच्या पानाचे वाचन कार्यक्रमाचे संयोजक श्री.तुषार वाघुळदे यांनी केले, 

विविध पुरस्कार:

प्रसंगी मान्यवरांनी कलावंतांसाठी भविष्यात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली

त्यात शरयू प्रभाकर पाटील पुरस्कार, कमल कृष्ण नारखेडे पुरस्कार, कृष्णा मोहन नारखेडे पुरस्कार, कवित्री कुसुमताई चौधरी पुरस्कार हे सर्व  पुरस्कार 22 एप्रिल रोजी लेवागणबोली दिवस साजरा करत असताना त्यादिवशी दिले जातील असे अध्यक्षांच्या वतीने घोषित करण्यात आले.

या संमेलनामध्ये खालील ठराव एकमताने पारित करण्यात आले  . 

ठराव क्र. १- 

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तीन डिसेंबर कवियत्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन "लेवा गणबोली दिन " म्हणून पाळला जावा असा ठराव मांडणारे सूचक, अनुमोदक आणि ठराव पास करणाऱ्या अधिसभा सदस्य यांचे अभिनंदन करण्यात यावे.

 सूचक - डॉ.अरविंद नारखेडे अनुमोदक - लीलाधर कोल्हे


ठराव क्र.२ 

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेत निवडून आलेल्या व नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करीत आहोत 

सूचक -डॉ अरविंद नारखेडे अनुमोदक - प्रभात चौधरी


ठराव क्र .३ 

 विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे आसोदा येथील स्मारक पूर्तता करण्यासाठी प्रश्न उपस्थित करणारे आमदार माननीय संजय भाऊ सावकारे यांचे अभिनंदन करीत आहोत 

सुचक - पराग तुकाराम पाटील अनुमोदक - प्रा विनय भा. पाटील

ठराव क्र. ४

 बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मोताळा व नांदुरा तालुक्यातील वर्षानुवर्ष राहत असलेल्या पाच लाख लेवा पाटीदारांचा २०१८

 मधील बुलढाणा गॅझेटीयर मध्ये उल्लेख न केल्यामुळे लेवा पाटीदार समाजाचा तसेच ही बोली बोलणाऱ्यांचा अपमान केलेला असल्यामुळे गॅझेटिअर विभाग प्रमुख डॉ. दिलीप प्र.बलसेकर यांचा जाहीर निषेध करीत आहोत 

सूचक -श्री नि रा पाटील अनुमोदक - प्रा. डॉ. विनय पाटील

ठराव  क्र.५

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील "बहिणाबाई  अध्यासन केंद्र" मार्फत समाजातील संशोधन करणाऱ्या भाषा संशोधकांसाठी किमान पाच लाखाचा निधी "बहिणाबाई लेवागण बोली भाषा संशोधन प्रकल्प"  मंजूर करून देण्यात यावा व त्यासाठी आर्थिक तरतूद विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात करण्यात यावी व प्रतिवर्षी विद्यापीठामार्फत त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात यावे 

सूचक -प्रा डॉ के.जी. कोल्हे अनुमोदक - प्रा डॉ विनय पाटील

ठराव क्र. ६

 साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेवागणबोली भाषेला स्वतंत्र बोलीभाषेचा दर्जा देण्यात यावा असा ठराव महाराष्ट्र शासनाच्या कला व सांस्कृतिक विभाग तसेच भाषिक अल्पसंख्यांक विभागाकडे पाठवण्यात यावा त्यासाठी सर्व संमेलनांचे संबंधित अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावे.

 असे सर्वानुमते ठरले

 सूचक -प्रा  एकनाथ नेहेते /

 श्री तुषार वाघुळदे 

अनुमोदक - श्री विष्णूभाऊ भंगाळे

    संमेलनाचे प्रास्ताविक जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व लेव गणबोली साहित्य मंडळाचे सचिव श्री.प्रभात दादा चौधरी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सौ.ज्योती राणे यांनी केला,

सूत्रसंचलन सौ.सुवर्ण लता पाटील व सौ. ज्योती राणे यांनी केले व आभार प्रा. संध्या पाटील यांनी केले

     संमेलनाच्या यशस्वी आयोजनासठी संयोजक तुषार वाघुळदे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रभात दादा चौधरी,शारदा चौधरी, कमल पाटील, राजेंद्र पाटील,शकुंतला चव्हाण, शोभा नापडे, गिरीश नारखेडे, अजय चौधरी, सुनील खडके, प्रमोद महाजन, एड.रजनीश राणे, दीपक चौधरी, विनय पाटील, विना नारखेडे, संध्या महाजन,लीलाधर कोल्हे, किशोरी वाघुळदे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप सौ.साधनाताई लोखंडे यांच्या आवाजात सामुहिक पसायदान म्हणून करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.