सावन कृपाल रुहानी मिशन, जळगाव शाखे कडून रक्तदान शिबिराचे 22 रोजीआयोजन
सावन कृपाल रुहानी मिशन, जळगाव शाखे कडून रक्तदान शिबिराचे 22 रोजीआयोजन
लेवाजगत न्यूज जळगाव-सावन कृपाल रूहानी मिशन, संत कृपाल आश्रम, गट नं 13/1/1, मोहाडी रोड, मोहाडी, जळगाव शाखेकडून महाबळ रोड, काव्य रत्नावली चौक मध्ये 22 जनवरी, 2023 रोजी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा मुख्य उद्देश दुर्घटनाग्रस्त बंधू-भगिनीं साठी रक्त पुरवठा तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाची जाणीव निर्माण करणे असा आहे. मिशनद्वारे वेळोवेळी मानवसेवा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते जे प्रशंसनीय कार्य आहे.
संत राजिंदर सिंह जी महाराज यांच्या सानिध्यात कार्यरत असलेल्या सावन कृपाल रुहानी मिशन मध्ये मानव सेवा कल्याणार्थ अनेक कार्यक्रम राबविले जातात. सावन कृपाल रुहानी मिशन द्वारा वेळोवेळी रक्तदान शिबीरांबरोबर मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर तसेच स्वास्थ्य चिकित्सा शिबीर यांचे आयोजन केले जाते. तसेच शारीरिक दृष्ट्या विकलांग बंधू भगिनींच्या सहाय्यते साठी उपकरणांचे वितरण केले जाते. या व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्कालीन स्थितीत जसे तमिळनाडू मध्ये आलेली सुनामी, उत्तराखंडमध्ये आलेली नैसर्गिक आपत्ती, जम्मू काश्मीर मध्ये आलेला महापूर तसेच नेपाळ मध्ये आलेला भूकंप या सर्व ठिकाणी मिशन च्या स्वयंसेवकांनी पिडीत लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत आवश्यक वस्तुंबरोबर लोकरीचे कपडे, कांबळे, स्वेटर, फोम च्या गादया तसेच औषधे यांचे सुद्धा वितरण केले गेले.
सावन कृपाल रुहानी मिशन चे अध्यक्ष संत राजिंदर सिंह जी महाराज आज संपूर्ण विश्वभरात ध्यान-अभ्यासाद्वारे प्रेम, एकता व शांति संदेशाचा प्रसार करीत आहेत. परिणाम स्वरूप त्यांना विविध देशांनी अनेक शांती पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरवीत करण्यात, आले. त्याबरोबरच पाच डॉक्टरेट च्या पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
सावन कृपाल रोहानी मिशन ची संपूर्ण विश्वभरात साधारण 3200 हून अधिक केंद्रे स्थापित केली गेलेली आहेत. तसेच मिशन चे साहित्य विश्व भरातील 55 पेक्षा अधिक भाषां मध्ये प्रकाशित झालेले आहे. याचे मुख्यालय विजयनगर दिल्लीत असून ,आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिके मध्ये आहे.
सावन कृपाल रुहानी मिशन
शाखा: जळगाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत