सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर कारमध्ये कोंबून सामूहिक बलात्कार
सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर कारमध्ये कोंबून सामूहिक बलात्कार
नागपूर वृत्त-दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून जंगलात कारमध्ये कोंबून दोघांनी सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना सावनेरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अखिल महाविर भोंगे (२६, रा. पंदराखेडी, ता. सावनेर) आणि पवन विठ्ठलराव बासकवरे (२४, मानेगाव, ता. सावनेर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी स्विटी(काल्पनिक नाव) ही सावनेरमधील एका विद्यालयात दहावीत शिकते. तिच्या वर्गमैत्रिणीचा आरोपी अखिल भोंगे हा प्रियकर होता. पवन बासकवरे त्याचा मित्र होता. २३ जानेवारीला सायंकाळी पवन आणि अखिल हे दोघेही स्वीटीला शाळेत भेटायला आले. स्विटीला कारमध्ये बसवून पवन आणि अखिलेशने कार नागपूर महामार्गाने घेतली. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
अशी आली घटना उघडकीससामूहिक बलात्कारामुळे स्विटी रस्त्यावर बेशुद्ध पडली. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाला ती दिसली. त्याने तिला पाणी दिले आणि घरी सोडून देण्याबाबत विचारले. तिने सावनेर पोलीस ठाण्यापर्यंत सोडण्याची विनंती केली. ती पोलीस ठाण्यात पोहचली. तिने पोलिसांनी घडलेली प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत