ट्रकी तापी नदीत कोसळला कोटा येथील असल्याचे पाण्यावर तरंगणारे ट्रकमधील कागदपत्र व लायसन्सवरून स्पष्ट झाले
ट्रकी तापी नदीत कोसळला कोटा येथील असल्याचे पाण्यावर तरंगणारे ट्रकमधील कागदपत्र व लायसन्सवरून स्पष्ट झाले
लेवाजगत न्यूज शिरपूर:- मुंबई-आग्रा महामार्गावरील तापी नदीवर असलेल्या सावळदे येथील पुलावर सोमवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशकडे मजुरांना घेऊन जाणारी क्रुझर उलटली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. क्रुझरमधील जखमी प्रवासी खाली उतरत असताना मागून भरधाव वेगातील ट्रक आला. या वेळी ट्रक चालकाने धडक टाळण्यासाठी जोरात ब्रेक दाबला.
पण चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलाचे कठडे तोडून थेट तापी नदीत कोसळला. हा ट्रक राजस्थानमधील कोटा येथील असल्याचे पाण्यावर तरंगणारे ट्रकमधील कागदपत्र व लायसन्सवरून स्पष्ट झाले. ट्रकमध्ये किती जण होते हे स्पष्ट झाले नाही. दिवसभर शोध मोहीम सुरू होती.
मुंबई-आग्रा महामार्गावरून सोमवारी रात्री वैजापूर येथून सेंधवा येथील हिंदली येथे मजुरांना घेऊन एक क्रुझर एमपी ०९ एफए ६५८७ जात होती. क्रुझरचा टायर फुटल्याने ती रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास तापी नदीवर सावळदे येथे असलेल्या पुलावर उलटली. क्रुझरमधील जखमी प्रवासी खाली उतरत असताना मागून भरधाव वेगात ट्रक जात होता.
या वेळी ट्रक चालकाने क्रुझरला धडक बसू नये म्हणून जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळला. अपघातानंतर पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेनंतर मंगळवारी सकाळी शोधकार्य सुरू झाले.
या वेळी मासेमारी करणाऱ्यांना ट्रक चालकाचा वाहन चालवण्याचा परवाना आणि इतर कागदपत्रे पाण्यावर तरंगताना आढळली. त्यानुसार ट्रकचा क्रमांक आरजे-२०-जीबी-८३९१ असल्याचे स्पष्ट झाले. तसेच या ट्रकमध्ये ऑटो पार्ट्स होते. ट्रक चालकाचे नाव दीपककुमार रामकिशोर रा. रामगड मंडी, कोटा असे आहे. चालकासह ट्रकमध्ये आणखी किती जण बसले होते हे स्पष्ट झालेले नाही. ट्रक चालकाचा तापी नदीत शोध घेण्याचे काम मंगळवारी सुरू होते. . ट्रक मालकाशी संपर्क, दिवसभर सुरू होते शोध अभियान
पोलिसांनी नदीत बुडालेला ट्रक काढण्याचे काम सुरू केले आहे. ट्रक मालकाशी संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत