तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन १७ जानेवारीला फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात
लेवाजगत न्यूज फैजपूर -तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन १७ जानेवारीला धनाजी नाना महाविद्यालयात होणार आहे. गुरुवारी फैजपूर येथील पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आमदार शिरीष चौधरी, प्राचार्य पी.आर.चौधरी, प्रभात चौधरी, तुषार वाघुळदे यांची उपस्थिती होती. तिसरे लेवा गणबोली साहित्य मंडळ व मधुस्नेह संस्था परिवाराने हे संमेलन आयोजित केले आहे. तसेच कवी केशवसूत बा.सी.मर्ढेकर, श्रीराम अत्तरदे, कवी भानू चौधरी, डॉ.श.रा.राणे यांचे भूमीत वास्तव्य होते. १७ जानेवारीला कवियत्री कुसुमताई चौधरी यांची जयंती आहे.
त्यामुळे साहित्य संमेलन स्थळाला कवयित्री कुसुमताई चौधरी साहित्य नगरी असे नाव दिले आहे. संमेलन अध्यक्षपदी जळगाव येथील लेवागणबोली साहित्यिक अरविंद कृष्णा नारखेडे यांची निवड झाली. ते भादली हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. संमेलनाचा प्रारंभ साहित्यिक व कवी प्राध्यापक भानू चौधरी यांच्या निवासस्थानापासून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर उद्घाटन परतवाडा कॉलेजचे प्राचार्य डॉ.काशिनाथ बऱ्हाटे यांच्या हस्ते होणार आहे. प्राचार्य पी.आर.चौधरी, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रभात चौधरी, आयोजन समिती सदस्य किशोरी वाघुळदे, संजय पाटील, लीलाधर कोरे, डॉ.विनय पाटील, प्रा.संध्या महाजन, ज्योती राणे, सुवर्णता पाटील आदी सहकार्य करत आहेत.
लेवा गणबोलीचा वापर संमेलनाचे आयोजक तथा मंडळाचे सचिव तुषार वाघुळदे, तर कार्याध्यक्ष प्रभात चौधरी आहेत. इतिहासकार तथा भाषा तज्ञ डॉ.नि.रा.पाटील हे मंडळाचे अध्यक्ष आहे. संमेलनात तीन चर्चासत्र होतील. यासोबत प्रकट मुलाखत, नाट्यछटा सादरीकरण, लेवा गणबोलीतील तसे मराठी कवी संमेलन होतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत