रुद्राक्ष घेण्यासाठी सिहोर येथे वीस लाखाची गर्दी मालेगाव येथील महिलेचा मृत्यू ,कित्येक महिला बेपत्ता
रुद्राक्ष घेण्यासाठी सिहोर येथे वीस लाखाची गर्दी
मालेगाव येथील महिलेचा मृत्यू ,कित्येक महिला बेपत्ता
वृत्तसंस्था भोपाळ -मध्य प्रदेशात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी रुद्राक्ष घेण्यासाठी तब्बल २० लाख लोकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. याच गर्दीत भोवळ येऊन मालेगाव येथील (जि.नाशिक) ५० वर्षीय माला खांडेकर यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. बुलडाण्याच्या एका महिलेसह अनेक जण बेपत्ता आहेत. परिस्थिती चिघळल्यामुळे पं. मिश्रा यांनी रुद्राक्ष वितरण बंद केले. रुद्राक्ष महोत्सवात सहभागी होण्यासाठी बुधवार-गुरुवारच्या रात्री लक्षावधी भाविक पोहोचले होते. एक रुद्राक्ष मिळवण्यासाठी काउंटर्सवर गर्दी उसळली.
बुधवार रात्रीपासूनच १० काउंटर्सवर कित्येक तास रांगेत असलेले हजारो लोक एकमेकांना ढकलत पुढे सरकू लागले. गुरुवारी पहाटे भाविकांतील धक्काबुक्की इतकी वाढली की शेकडो लोकांचा जीव गुदमरू लागला. महिला-पुरुष भोवळ येऊन पडले. रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी हाेऊन १५ किमीपेक्षा मोठा जाम लागला. पायी चालणाऱ्या भाविकांची संख्याही प्रचंड होती.
नंदूरबारच्या सुकर्णा, सरला म्हणाल्या - रात्रभर रांगेत उभे राहूनही रुद्राक्ष मिळालेच नाही : कथास्थळाहून दुपारनंतर भाविक परतू लागले. त्यांना न पाणी मिळाले ना जेवण. ज्या रुद्राक्षासाठी ते शेकडो किमीचा प्रवास करून आले होते, तेही मिळाले नाही. नंदूरबारच्या सुकर्णा, सरला आदींनी सांगितले की, माझ्या मामाचे कुटुंब हरवले आहे. रुद्राक्षासाठी आम्ही येथे आलो होतो. मात्र रात्रभर रांगेत उभे राहूनही रुद्राक्ष मिळाले नाही. रानू आपटे म्हणाल्या, कथा तर टीव्हीवरही ऐकतो, मात्र येथे खास रुद्राक्षासाठी आलो होतो. येथे तर
जेवणही मिळाले नाही.
पं. मिश्रा म्हणाले, काशीत एक असे भवन आहे जेथे लोक मरण्यासाठी जातात : दुपारी दीड वाजता पं. प्रदीप मिश्रा कथास्थळी पोहोचले. ते म्हणाले, काशीत एक असे घर आहे ज्यात लोक मृत्यूसाठी जातात. ते घर भाड्याने दिले जाते. शेवटच्या क्षणी भजन कीर्तन करावे. एका महिन्यात मृत्यू आला नाही तर तेथून परत पाठवले जाते.
महाराष्ट्रातील भाविकांची कुटुंबे हरवली
कुबेरेश्वर धाममध्ये महाराष्ट्रातील शेगावची पायल, दर्शन राठी आणि त्यांच्या ५ वर्षांचा मुलगा आईशला आजी शोधत होत्या. अचानक धावत दैनिक भास्कर टीमजवळ आलेल्या नागपूरच्या रजनी सेलारकर म्हणाल्या, भय्या माझे कुटंुब हरवले आहे. तुम्ही अनाउन्समेंट करवून द्या. सकाळपासून उपाशी-तापाशी त्यांना शोधतेय. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अनेक कुटुंबांची भेट झाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत