Contact Banner

सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सव साठी गेलेल्या सावदा येथील भाविकांच्या घरातून ६५ हजाराचा ऐवज लंपास..! बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यासह रोकड लंपास..!

 

सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सव साठी गेलेल्या सावदा येथील भाविकांच्या घरातून ६५ हजाराचा  ऐवज लंपास..!  बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यासह रोकड लंपास..!

सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सव साठी गेलेल्या सावदा येथील भाविकांच्या घरातून ६५ हजाराचा  ऐवज लंपास..!

बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यासह रोकड लंपास..!

लेवाजगत न्यूज सावदा- येथील शिवाजी चौक परिसरातील  वंजार वाडीतील रहिवासी शिवसेना शहर सचिव,इलेक्ट्रिक दुकान चालक शरद गिरधर भारंबे  हे आपल्या कुटुंबासह सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सव या  कार्यक्रमासाठी  कुटुंबासह दिनांक १५ रोजी गेले होते. त्यांच्या पश्चात घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कुण्या अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात अनाधिकृतपणे प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या तिजोरीतील वडिलो पारजीत असलेले १५ ग्रॅम सोन्याचे दागिने(दोन अंगड्या प्रत्येकी ५ग्रॅम, कानातील डोरले ५ग्रॅम)  तसेच घरात असलेल्या देव्हाऱ्यातील लाकडी ड्राव्हर मध्ये मोबाईल घेण्यासाठी ठेवलेले २० हजार  रुपये ठेवलेले होते, असा एकूण  ६५ हजार कोण्या अज्ञात चोरट्याने लंपास करून घराच्या दरवाजाचे कुलूप रस्त्यावर फेकून दिले होते.

     याबाबत त्यांच्या शेजारी असलेल्या  त्याचा पुतण्या वामन भारंबे यांनी शरद भारंबे हे सिहोर येथून घरी परतीच्या वेळेत येत असताना त्यांना दूरध्वनीवरून ही घटनेची माहिती दिली या बाबत वृत्त कळताच शरद भारंबे त्वरित घरी परत आल्याने  घडलेला प्रकार  उघडकीस आल्याने  त्यांनी सावदा पोलीस ठाणे धाव घेऊन त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पुढील तपास स पो नि जालिंदर पळे याचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप नि अन्वर तडवी तपास करीत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.