मुंबई लोकलबाबत मोठी बातमी: खारकोपर स्थानकाजवळ डबे घसरले
मुंबई लोकलबाबत मोठी बातमी: खारकोपर स्थानकाजवळ डबे घसरले
लेवाजगत न्युज मुंबई:- हार्बर मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकात येत असलेल्या लोकल ट्रेनचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. यामुळे खारकोपर ते नेरुळ लोकल सेवा ठप्प झाली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास घडली.
हार्बर मार्गावरील लोकलमध्ये अनेकदा बिघाड होत असलेल्या घटना ऐकायला येतात. मात्र आज रेल्वेचे चाक रुळावरून घसरल्याची घटना घडलेली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. रेल्वेचं चाक रुळावरून घसरतातच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं. प्रत्येक जण स्वतःला वाचनवण्याच्या उद्देशाने बाहेर पडत होता. दुर्घटनेच्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पोहचले असून लोकलचे डबे पूर्ववत करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
रिलीफ ट्रेन घटनास्थळी पोहचल्या असून गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. केवळ बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गांवरील वाहतूक बंद आहे. हार्बर, मेन लाईन आणि इतर मार्गांवरील वाहतूक सुरुळीत चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत