भारत भूमी हीच खरी विज्ञानाची जननी-प्रा.डी.बी.तायडे.
भारत भूमी हीच खरी विज्ञानाची जननी-प्रा.डी.बी.तायडे.
लेवाजगत फैजपूर: येथील धनाजी नाना महाविद्यालय रसायनशास्त्र विभागा अंतर्गत केमिस्ट्री असोसिएशन व रिसर्च कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.योगेश तायडे यांनी करून दिला. रसायनशास्त्र विभागाचे ज्येष्ठ प्रा. डॉ.ए.के.पाटील यांनी विज्ञानाचे महत्त्व समजण्यासाठी शास्त्रज्ञाचे चारित्र्य वाचले पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम घ्यावेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.डॉ.सचिन येवले यांनी रमण इफेक्ट चा शोध कसा लागला तसेच रमण इफेक्ट चा उपयोग पोलिसांना कसा करता असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले आणि संशोधकांनी एकमेकांमध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण करावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष व विभाग प्रमुख प्रा.डी.बी.तायडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा करण्यात यावा व त्याचे खरे जनक कोण? विज्ञान दिवसाची खरी संकल्पना डॉ.वसंत गोवारीकर यांनी मांडली त्याचप्रमाणे विज्ञानाचे खरे मूळ म्हणजे गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून विज्ञानाची निर्मिती झालेली आहे. श्रद्धेतून अंधश्रद्धा उदयास येते व अंधश्रद्धा प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करते.तर विज्ञानाची प्रगती विषयी त्यांनी विस्तीर्ण मुद्दे विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.पल्लवी भंगाळे आणि कार्यक्रमाचे आभार प्रा.अचल भोगे यांनी केले तसेच त्यांच्यासोबत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.राकेश डी. तळेले, प्रा.शेरसिंग पाडवी, प्रा.डॉ.हरीश तळेले, प्रा.डॉ.मच्छिंद्र पाटील, प्रा.विकास वाघुळदे, प्रा.नाहीदा कुरेशी, प्रा.सुजित भाट , प्रा. सुहास तायडे प्रा.ऋतुजा महाजन, प्रा.सुवर्णा झोपे प्रा.पूजा महाजन, प्रा.मृणाली चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत