Contact Banner

विटनेर दर्ग्यावर पाकिस्तानी झेंडा फडकवल्या प्रकरणी कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Court-order-filing-case-in-Pakistan-flag-hoisting-at-Vitner-Darga


 विटनेर दर्ग्यावर पाकिस्तानी झेंडा फडकवल्या प्रकरणी कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

वृत्तसंस्था जळगाव -तालुक्यातील विटनेर येथील‎ दर्ग्यावर पाकिस्तानचा झेंडा‎ फडकविल्याचा प्रकार ३१ जानेवारी‎ समाेर आला हाेता. या प्रकरणी‎ तक्रार देऊन गुन्हा दाखल न‎ झाल्याने तक्रारदाराने न्यायालयात‎ जावून दाद मागितली. या प्रकरणी‎ न्यायाधीश जे. एस. केळकर यांनी‎ राजद्राेहाचा गुन्हा दाखल करण्याचे‎ आदेश १७ फेब्रुवारी राेजी पाेलिस‎ प्रशासनाला दिले आहेत.‎ विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे‎ जिल्हा कार्यकर्ता हेमंत गणेश गुरव‎ (रा. लोहारा ता. पाचोरा) यांना‎ जळगाव तालुक्यातील विटनेर गावा‎ लगत असलेल्या दर्ग्यावर‎ पाकिस्तानचा झेंडा लावल्याची‎ माहिती मिळाली हाेती. त्यांनी खात्री‎ करून त्याबाबत पाेलिस पाटील व‎ एमआयडीसी पाेलिस ठाण्याला‎ याची माहिती दिली हाेती. तसेच‎ रितसर तक्रार दिली हाेती. 

     याप्रकरणी‎ पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात‎ नकार दिल्याने गुरव यांनी ३१‎ जानेवारी राेजी जिल्हा पोलिस‎ अधीक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज‎ दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने या‎ प्रकरणी अॅड केदार भुसारी यांच्या‎ मार्फत न्यायालयात तक्रार दाखल‎ केली हाेती. त्यावर न्यायाधीश जे.‎ एस. केळकर यांच्या न्यायालयाने‎ १७ फेब्रुवारीला देशद्रोहाचे १२४अ,‎ १५३ अ, २९५अ, ५०५, ३४. नुसार‎ गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहे.‎



बातमी शेअर करा.

 संदर्भ- दिव्यमराठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.