विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या
विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या
वृत्तसंस्था यावल-शिरसाळे बुद्रूक येथील माध्यमिक विद्यालयात सातवी ते नववीपर्यंत टॉपर आलेल्या, दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी स्लॅबच्या लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
२२ रोजी पहाटे मुलीचे वडील तिला अभ्यास करण्यासाठी उठवायला गेल्यानंतर घटना उघड झाली. मानसी विलास चौधरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. दहावीच्या पूर्व परीक्षेतही गणित, इंग्रजी व सायन्समध्ये वर्गात तिने पहिल्या क्रमांकाचे गुण मिळवले होते, असे मुख्याध्यापक संजय बोरसे यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत