Contact Banner

जुन्या वादातून दोन कुटुंबामध्ये हाणामारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रारीवरुन गुन्हा दाखल

 

Due to old-dispute-two-families-clash-midc-police-station-against-complaint-filed-complaint

जुन्या वादातून दोन कुटुंबामध्ये हाणामारी

एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रारीवरुन गुन्हा दाखल


लेवाजगत न्यूज जळगाव -तालुक्यातील चिंचोली येथे मागील वादातून दोन कुटुंबामध्ये लाठ्या काठ्या व लोखंडी रॉडने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरुन सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

    जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे संतोष भगवान लाड हे पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. संतोष लाड यांचा मुलगा ओम याचा पाण्याचा डबा सांडल्याच्या कारणावरुन गावातीलच धनराज मुकूंदा घुगे याच्याशी वाद झाला. या वादातून धनराज याच्यासह आशुतोष मुकूंदा घुगे, गणेश मुकूंदा घुगे हे तीघे भावंड २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास संतोष लाड यांच्या घरी आले. यादरम्यान लाठ्या काठ्यांनी तसेच लोखंडी रॉडने तिघांनी घरात घुसून संतोष लाड व त्यांचा मुलगा ओम लाड व पत्नी सुनिता लाड यांना बेदम मारहाण केली. यात पती, पत्नी व मुलगा हे तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी संतोष लाड यांच्या तक्रारीवरुन गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आशुतोष मुकूंदा घुगे, गणेश मुकूंदा घुगे आणि धनराज मुकूंदा घुगे या तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    दरम्यान याच वादातून त्रृषीकेश मुकूंदा घुगे या तरुणाने तक्रार केली आहे. धानवड रस्त्यावर त्रृषीकेश हा त्याचा मित्र गौरव सोबत बाथरुमला गेले, यादरम्यान ओम संतोष लाड, सचिन मधुकर वाघ व प्रणव विनोद लाड या तिघांनी त्रृषीकेश यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर निर्मलाबाईसह ओम, सचिन व प्रणव या तिघांनी त्रृषीकेश याच आईला लोखंडी पाईपने मारुन दुखापत केली, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, या तक्रारीवरुन ओम संतोष लाड, सचिन मधुकर वाघ,  प्रणव विनोद लाड व निर्मलाबाई लाड सर्व रा. चिंचोली या चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . या दोन्ही घटनांचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.