Contact Banner

तासखेड्यात कानीफनाथ महाराजांचा उत्सव, १२५ वर्षाची परंपरा कायम

 




तासखेड्यात कानीफनाथ महाराजांचा उत्सव, १२५ वर्षाची परंपरा कायम 

 प्रतिनिधी तासखेडा-येथून जवळच असलेल्या  तासखेडा तालुका रावेर येथे सालाबादप्रमाणे १२५ वर्षाची परंपरा कायम राखत  कानिफनाथ महाराजांचा उत्सव साजरा करण्यात आला . 

   याबाबत सविस्तर असे की येथील चौधरी परिवार पिढी जात पासुन कानीफनाथ महाराजांचा उत्सव यथासांग पद्धतीने साजरा करतात . सकाळी ४ वाजे पासुन सर्व स्थापीत देवी दैवतांची पुजा केली जाते त्यानंतर सकाळी ९ वाजता कानीफनाथ महाराजांच्या (बाणा )काठीची अंघोळ व पुजे साठी तापी नदीवर सर्व परिवारा सह सर्व ग्रामस्थ घेऊन जातात त्यानंतर नदीवरीलपुजा आटोपल्यावर

काठीला नविन कापड परिधान करून सजविली जाते  .त्यानंतर भगत वृंद त्या काठीला खेळविता त्यात श्रीराम गोसावी, चंद्रभान चौधरी, प्रकाश चौधरी यांना मान दिला जातो . तेथुन ते हनुमान मंदीरा जवळून जुने भगत वृंदांच्या समाधी वर त्यांची पुजा करतात तेथून नागनाथ महाराजांचा मंदीरावर जातात . पुढे आज ही प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान कृष्णा बाबां च्या मंदीरावर येतात  तेथे पुजाअर्चा झाल्यावर त्या ठिकाणी भावीक नवस मानतात व त्यांची मनोकामना १०० टक्के पूर्ण होते . अशी आख्यायीका आहे तेथुन कानिफनाथांचे पहिले भगत दामू बाबांच्या मंदिरावर जातात परत संपूर्ण गावातुन काठीची मिरमणुक काढण्यात येते ठिकठिकाणी भगत वृंद व काठीची पुजा करतात .

       दुपारच्या सत्रात संध्याकाळी कानिफनाथ महाराजांच्या मंदीरातून आरत्या काढण्यात येतात . ते चांदसावली व नामतुल्ला यांच्या दर्गावर चादर चढवितात . परत तेथुन जुन्या भगत वृंदांच्या समाधीवर जातात व डफाच्या चालीवर कानीफनाथ महाराजकी जयच्या जयघोषात मंदीरात येतात . रात्री ८ वाजता पूर्वी पासून चौधरी परिवार उळदाचे वरण व भाकरीचा महाप्रसाद करतात तो संपूर्ण गावाला महाप्रसादाचा वाटप केला जातो. या संपूर्ण कार्यक्रमासाठी परिवारातील बाहेरगावी असलेले व महाराष्ट्रातुन भाविक मोठया संख्येने उपस्थित असतात दरवर्षी हा उत्सव महाशिवरात्र झाली म्हणजे पुढच्या येणाऱ्या गुरुवारी पूर्वी पासुन साजरा केला जातो . या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ अथक परिश्रम घेतात .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.