चिर्ले येथील शिव मंदिरात महाशिवरात्री उत्सहात साजरी
चिर्ले येथील शिव मंदिरात महाशिवरात्री उत्सहात साजरी
उरण ( लेवाजगत न्यूज सुनील ठाकूर)-सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्त गोयल परिवारा कडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोज नाने महाशिवरात्री चा सणं उत्सहात साजरा झाला.
दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8 वाजतां जागरण व भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री दिवशी सकाळी 6 वाजतां रुद्रभिषेक ,सकाळी 8 वाजतां हवन,व पूर्णाहुती, सकाळी 8 वाजल्या पासून दर्शना साठी आलेल्या शिव भकांसाठी गोयल परिवारा कडून फलहार व भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे पासूनच शिव मंदिरात भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर बम बम भोले च्या गजरात फुलून गेला होता.
यावेळी सुधीर शिवचरण गोयल,मोहित गोयल,रुपाली मोहित गोयल,उर्मिला कुमार,लोकेश गर्ग ,अचलं गर्ग ,जगदीश अग्रवाल, प्रीतम मुंबईकर,,भाजप जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, आदीसह हजारो शिव भक्तांनी श्री शंकराचे दर्शन घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत