Contact Banner

गोवरचा प्रादुर्भावाचे शहरात आढळत आहे संशयित रुग्ण

 

Measles-outbreak-in-the-city-is-suspected-patient

गोवरचा प्रादुर्भावाचे शहरात आढळत आहे संशयित रुग्ण 

लेवाजगत न्यूज जळगाव -शहरात गोवरचा प्रादुर्भाव वाढतच‎ आहे. गेल्या आठवड्यात दोन‎ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले‎ तर पाच संशयित रुग्ण नव्याने‎ आढळून आले आहेत. अहवाल‎ येण्यास विलंब होत असून,‎ अहवालापूर्वीच रुग्ण बरा होत‎ असला तरी वाढती रुग्णसंख्या‎ चिंताजनक आहे.‎ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार‎ शहरात विशेष लसीकरण मोहीम‎ राबवण्यात आली. त्यात पहिली‎ मोहीम डिसेंबर महिन्यात तर दुसरी‎ मोहीम जानेवारी महिन्यात‎ राबवण्यात आली. यात ज्या‎ बालकांचा गोवरचा पहिला व दुसरा‎ डोस बाकी आहे अशा बालकांचे‎ लसीकरण करण्यात आले.

     यासोबतच ज्या भागात गोवरचा‎ उद्रेक आहे .अशा भागात बालकांना‎ लसीचा तिसरा डोस देण्यात आला.‎ मात्र तरीदेखील गोवर बाधितांच्या‎ संख्येत वाढ होत आहे. गेल्या‎ महिन्याभरात शहरात २५ रुग्णांचे‎ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले‎ आहेत. ताप व अंगावर पुरळ येणे ही‎ गोवरची प्रमुख लक्षणे असल्याने‎ पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे‎ गरजेचे आहे. मुलाला ही लक्षणे‎ असल्यास शाळेत पाठवू नये, असे‎ आवाहन डॉक्टरांनी केले आहे.‎ मेहरूण, तांबापुरा, जुने जळगाव या‎ भागात गोवरचा उद्रेक दिसून येत‎ आहे. म्हणून धाेका वाढताे आहे.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.