राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ११ व १२ मार्चला भुसावळ येथे
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ११ व १२ मार्चला भुसावळ येथे
लेवाजगत न्यूज-भुसावळातील स्नेहयात्री प्रतिष्ठान आयोजित स्नेहयात्री करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ११ व १२ मार्चला रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात होणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, वर्धा, सोलापूर, धुळे, नाशिक, जळगावसह संपूर्ण राज्यातून १६ संघ त्यात सहभागी होतील. पहिले सांघिक परितोषिक ११ हजार रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय ७ हजार रुपये व स्मृतिचिन्ह आणि तृतीय पारितोषिक ४ हजार व स्मृतिचिन्ह असे आहे. स्नेहयात्री करंडक स्पर्धेचे यंदाचे तिसरे पर्व आहे. राज्यभरातील १६ संघ त्यात एकांकिका सादर करतील.
त्यात सुमारे २०० तरुण नाट्य कलावंतांचा प्रत्यक्ष सहभाग असेल. या स्पर्धेसाठी ५० हजार रुपयांच्या एकूण बक्षिसांसोबत आकर्षक स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्र दिले जातील. दोन दिवस भुसावळकर रसिक प्रेक्षकांना यामुळे नाट्य मेजवानी उपलब्ध होईल. नामवंत व तज्ज्ञ परीक्षकांचा चमू परीक्षण करेल. डिजिटल स्क्रीन व लाइट इफेक्टच्या माध्यमातून संपन्न होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याची तयारी आयोजक स्नेहयात्री प्रतिष्ठानने सुरू केली आहे, असे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत