मुक्ताई व चांगदेव यात्रेला दोनशेच्यावर दिंड्या दाखल
मुक्ताई व चांगदेव यात्रेला दोनशेच्यावर दिंड्या दाखल
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर-माघ कृष्ण अष्टमीपासून सुरु झालेल्या मुक्ताबाई व चांगदेव महाराजांच्या यात्रोत्सवादरम्यान, मुक्ताईनगर पंचक्रोशीतील दीडशे ते दोनशे दिंड्या दाखल झाल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि खान्देश या चारही परिसरातून या दिंड्या दाखल होत अाहेत. गुरुवारी सकाळी मुक्ताईनगरकडे आणि सायंकाळपर्यंत नवीन मुक्ताई मंदिर तसेच श्री क्षेत्र कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिरावर या दिंड्या दाखल होणार आहेत. संक्तोक्ती नुसार वारकरी संप्रदायात संतांच्या वारीला दरवर्षी पायी चालत येण्याची दिर्घ परंपरा लाभलेली आहे. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई//" जयघोषात वारकरी पावली टाकीत तल्लीन होऊन भजन गात आहेत. शहरवासियांनी वारकऱ्यांचे चहापाणी देत स्वागत केले. दोनशेहून अधिक दिंड्यातून लाखांवर भाविक मुक्ताईनगरात दाखल झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत