Contact Banner

बारा वर्षांपासून फरार आरोपीस पकडण्यात सावदा पोलिसांना यश

 

Twelve-years-absconding-accused-in-capture-Savada-police-successful

बारा वर्षांपासून फरार आरोपीस पकडण्यात सावदा पोलिसांना यश

लेवाजगत न्यूज सावदा -गेल्या १२ वर्षांपासून फरार असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला येथील भोईवाडा येथून पकडण्यात  पोलिसांना यश मिळाले. प्रकाश भिवसन उर्फ भूषण  भोई असे या आरोपीचे नाव असून तो सावदा येथीलच रहिवासी आहे.येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार येथील पोलिसांत दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश भिवसन उर्फ भूषण भोई, रा. सावदा हा शहरातील भोईवाडा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. सपोनि पळे यांनी लगेच पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार पांडुरंग सपकाळे, यशवंत टहाकळे, अक्षय हिरोळे, उमेश पाटील, मेहबान तडवी, देवेंद्र पाटील, बबन तडवी, संजय तडवी अशा पोलिस अंमलदारांचे पथक तयार करुन त्यांना आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. आरोपी प्रकाश भोई यास संशय आल्याने तो लपलेल्या जागेतून बाहेर निघून पळू लागला. त्यावेळी पोलिस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडून अटक केली. तपास सपोनि जालिंदर पळे व सहकारी करत आहेत.

लेवाजगत


काय आहे गुन्हा 

आरोपी प्रकाश भोई पत्नी सुनीता भोई (वय ३५) हिच्यासह टेलिफोन ऑफिसजवळील झोपडपट्टीत वास्तव्यास होता. ६ जून २०१० रोजी प्रकाश हा दारू पिऊन आला. त्यावर पत्नी सुनीता हिने त्यास बोलली की तुम्ही नेहमी दारू पिऊन येतात. घरच्या वस्तू विकतात. घराचे पत्रेही विकले. या बोलण्याचा राग आल्याने प्रकाश याने तिला मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जीवे मारण्यासाठी पेटवून दिले होते. या घटनेत गंभीर दुखापत होवून सुनीता भोई हिचा मृत्यू झाला होता. तेव्हा हा गुन्हा दाखल झाला. परंतु आरोपी प्रकाश पसार झाला होता.

लेवाजगत खारघर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.