माय मराठी-डॉ.अनिता बेंडाळे यांची कविता
माय मराठी-डॉ.अनिता बेंडाळे यांची कविता
माय मराठी भाषेचे महाराष्ट्र हे माहेर
माती आपुली माय मराठी
ध्वजा रोवली ही महाराष्ट्राची
यशाची आशा मराठी भाषा
थोर महती महाराष्ट्राची पावन भूमी
ही संतांची
माझ्या महाराष्ट्राची मराठी भाषा घडविले श्री चे स्वराज शिवरायांनी अखंड
महाराष्ट्राचे कुलदैवत ते
मराठी ही राजभाषा असे
गोडी अमृताची शान ही महाराष्ट्राची
शिवबाची माय भूमी मराठी
आंबेडकरी कर्मभूमी मराठी
टिळक,गोखले,शाहू,फुलेंनी
जगविली,गाजविली,रुजविली
मराठी
माझ्या मराठी भाषेची काय सांगू
महती
साता सुमुद्रापार आहे तिची ख्याती
भाषा वैभवात जगी महान ती
धर्म पंथ,जात एक जागती
ज्ञानदेवांनी पसायदान मराठीत दिले
तुकारामांनी ४१४१ अभंग रचून
मराठीला धन्य केले
समर्थ रामदासांनी महान दास बोध
ग्रंथ रचियेला
शांताई बहिणाई लाडक्या लेकि
साऱ्या गनबोली ची माय मराठी
माऊली माझी माय
महाराष्ट्र माझा अभिमान
त्याची ही शान
डॉ. अनिता बेंडाळे
नाशिक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत