सावदा येथील परीक्षा केंद्रावर पंकज आशिया यांची भेट
सावदा येथील परीक्षा केंद्रावर पंकज आशिया यांची भेट
लेवाजगत न्यूज सावदा - बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून कॉपीमुक्त महाराष्ट्र हे अभियान संपूर्ण राज्यात बघायला मिळत आहे .त्याचाच प्रत्येय सावदा येथील पालिकेच्या श्री.आ.गं.हायस्कूल येथे आला जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी श्री. आ गं हायस्कूल शाळेची संपूर्ण पाहणी केली.तसेच कॉपीमुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल विभागाचे बैठे पथक या सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारावी परीक्षेच्या केंद्रावर सावदा व बाकी केंद्रावर जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य अधिक कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी दिली यावेळी सावदा येथील बारावी च्या परीक्षा केंद्राचा कडक बंदोबस्त सावदा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी ठेवला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत