रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघोडे येथे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस समारंभ संपन्न
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघोडे येथे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस समारंभ संपन्न
उरण (लेवाजगत न्यूज सुनील ठाकूर )-रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघोडे येथे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. श्रीगणेशाची आराधना करून सरस्वती मातेला वंदन करून शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आयोजित कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. प्राविण्य मिळवलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे त्यांच्या आई वडिलांन सोबत त्यांचे गुणगौरव वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांना आपल्या गुणवंत मुला- मुलीचा शाळेकडून असा गुणगौरव करण्यात आल्याने त्यांचे मन भरून आले. त्याचप्रमाणे गावातील विविध क्षेत्रातील विविध सत्कारमूर्तीचे सत्कार ठेवण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी रंगमंचावर विविध कलागुण सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी शाळेच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून शाळेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश पाटील यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमास दिघोडे ग्रामपंचायत सरपंच सोनिया घरत, उपसरपंच पूजा पाटील, ग्रामपंचायत सदस्या कविता म्हात्रे, लोचन पाटील, तृप्ती पाटील, दिनेश नांदगावकर, मच्छिंद्र कोळी, सुहास गोवारी, कीर्तीनिधी ठाकूर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा प्रियांशा शेट्ये, ग्रामसेविका मत्स्यगंधा पाटील, प्रशासक अनिल नारंगीकर, मान्यवर मनिषा गिजे,ज्ञानदिप म्हात्रे,योगिता पाटील, शंकर कारतुकर उपस्थित सत्कारमूर्ती क्रिकेटर विश्वजित ठाकुर, इतिहास संशोधक अभिषेक ठाकूर, शिक्षणप्रेमी लक्ष्मण पाटील,
विस्तार अधिकारी नामदेव कोळी, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष मालती पाटील, शिक्षण प्रेमी सचिन कोळी, शिक्षण प्रेमी रमण कासकर,धावपटू श्रेया पाटील, एमआयडीसी एरिया मॅनेजर वर्षकेतू ठाकूर, शिक्षणप्रेमी गिरिष ठाकूर, शिक्षणप्रेमी अभिजित पाटील, माजी उपसरपंच कैलास म्हात्रे, युट्यूब लॉगर समिता कोळी, माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शरयू ठाकूर, तसेच शिक्षक वर्ग उपशिक्षक नवनीत माळी,उपशिक्षिका सविता वारंग,गीता नवाळे,संगणक शिक्षिका अपेक्षा कासकर तसेच अंगणवाडीच्या मंदा कोळी,प्रभावती ठाकूर,लता कोळी त्याचप्रमाणे पत्रकार सुनिल ठाकूर,नंदकुमार तांडेल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र ठाकूर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत