Contact Banner

सावदा येथे परमीट रूममधून रोकडसह लॅपटॉप व डीव्हीआर लंपास

 

Save-here-permit-from-room-with-cash-laptop-and-dvr-lumpas

सावदा येथे परमीट रूममधून रोकडसह लॅपटॉप व डीव्हीआर लंपास

लेवाजगत न्यूज सावदा- येथील परमिट रूम बिअर बार मधून चोरट्यांनी रोकडसह सुमारे ६३ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सावदा फैजपूर रोडवर घडली आहे.

   या संदर्भातील वृत्त असे की, सावदा येथील फैजपूर रोड वरील न्यू पंजाब हॉटेल व परमीटररूम बार येथे चोरी झाल्याची  जतीन अरोरा यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नीच्या नावे असणार्‍या हॉटेल न्यूज पंजाब मधून दिनांक २३ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सात हजार रूपयांची रोकड, लॅपटॉप, सीसीटिव्हीचा डीव्हीआर, सिगरेटची पाकिटे असा एकूण सुमारे ६३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

   या प्रकरणी जतीन भारतभूषण अरोरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात  भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक अनवर तडवी हे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.