Contact Banner

श्री क्षेत्र डोंगरदे येथे शुक्रवार व शनिवार रोजी वार्षिक उत्सव

श्री क्षेत्र डोंगरदे येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी वार्षिक उत्सव


 श्री क्षेत्र डोंगरदे येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी वार्षिक उत्सव

लेवाजगत न्यूज डोंगर कठोरा- यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी निसर्गरम्य व पुरातन अध्यात्मिक श्रीपंत आनंदवन श्री क्षेत्र डोंगरदे येथे मंदिर आहे.येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही वार्षिक महोत्सव ३ व ४ फेब्रुवारी रोजी होत आहे. 

 शुक्रवार  रोजी दुपारी तीन ते सहा पालखी महोत्सव तर शनिवार रोजी महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज (फैजपूर), महामंडलेश्वर श्री श्री पुरुषोत्तम दासजी महाराज (खंडोबा देवस्थान फैजपूर), गोपाळ चैतन्यजी महाराज ( वृंदावन धाम पाल), महंत कृष्णगिरी जी महाराज (सावदा), खानदेश रत्न शास्त्री भक्ती किशोरदासजी (स्वामीनारायण मंदिर सावदा), | महानगर सुरेश शास्त्री मानेकर बाबा (श्रीकृष्ण मंदिर, सावदा) या संतांची उपस्थिती लाभणार आहे.

       दुपारी बारा ते तीन पर्यंत महाप्रसादाचे वाटप प्रदीप जगन्नाथ कोलते व साधना प्रदीप कोलते (डोंगरकठोरा, ह.मु. भुसावळ) यांच्यातर्फे होणार आहे. धार्मिक कार्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन स्वरूपानंद महाराज व विश्वस्तांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.