थोरगव्हाण येथे थोर सन्मीत्र युवा फाऊंडेशनतर्फे दि .४ रोजी वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन
थोरगव्हाण येथे थोर सन्मीत्र युवा फाऊंडेशनतर्फे शनिवारी वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन
लेवाजगत न्युज तासखेडा ता रावेर :-येथुन जवळच असलेल्या थोरगव्हाण येथे सालाबादप्रमाणे दि .४ फेब्रूवारी रोजी युवा सन्मीत्र फाऊंडेशनमार्फत वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे वधु वर परिचय सूची मध्ये नाव दिलेल्या सुचिचे कार्य प्रगतीपथावर सुरु आहे . वधू वर पालकांना सुची मेळाव्यात मिळेल समाज्यातील विवाह इच्छुक वधु वर पालकांनी उपस्थिती दयावी असे थोर सन्मीत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष उमाकांत वसंत बाऊस्कर यांनी आव्हाण केले आहे . सचिव योगेश भागवत झोपे खजीनदार विलास चौधरी यांचे सह सर्व पदाधिकारी सदस्य कोरोना कालखंडानंतर पालकांचा उत्साह पाहाता कार्यक्रमाचे योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनमोल सहकार्य करीत आहे . अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम संपन्न होणार असून सर्व समाज बंधूंनी उपस्थीत राहून सहकार्य करावे अशी सन्मित्र युवा फॉऊंडेशनच्या माध्यमातून कळविण्यात येत आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत