Contact Banner

आपले विवरे लेवा मित्र मंडळाने पुणे येथे जुन्या चालीरीती जपण्यासाठी घेतला स्नेह मेळावा


आपले विवरे लेवा मित्र मंडळाने पुणे येथे  जुन्या चालीरीती जपण्यासाठी घेतला स्नेह मेळावा


आपले विवरे लेवा मित्र मंडळाने पुणे येथे  जुन्या चालीरीती जपण्यासाठी घेतला स्नेह मेळावा 

लेवाजगत न्यूज पुणे-येथील गेल्या वीस ते पंचवीस वर्षा पासून व्यवसाय,नोकर,उद्योग,शिक्षण या निमित्त गावाकडून येथे असलेल्या रहिवाश्यांनी ,आपले  "विवरे लेवा मित्र मंडळ " यांचा १९/२/२०२३ रोजी झालेला स्नेह मेळावा अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडला .कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकारी  विवेक गिरीश बेंडाळे यांचे मागील  वर्षी दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली नंतर बालकलाकार काव्या बेंडाळे हिने गणेशवंदना गीत सादर करून कार्यक्रमाची  सुरुवात केली, हर्षा पाचपांडे यांनी कार्यक्रमाला अनुसरून सुंदर गाणे म्हटले व उपस्थितांनी त्याला साद दिली.

 स्नेह मेळाव्यास पुणे, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, चिखली या भागात राहणारे आपले विवरेकर महिला,पुरुष कुटूंबासह उपस्थित होते.

  यावेळी मेळाव्यानिमित्त समाज सुदृढ बनण्यासाठी आणि समाजाच्या सक्षमीकरणासाठी समाजव्यवस्थेचे भक्कम असणे गरजेचे असते. पूर्वी गावा गावातून विशिष्ठ समाज एकत्रित राहून आपापल्या समाजांच्या चाली रूढी परंपरा जपत असत. एकत्रित येऊन हया परंपरांचे आयोजन करावे लागत होते आणि एकत्रित आल्याने एकोप्याचे भावनांचे संगोपन केले जात होते.

पण आता काळाच्या ओघात समाजव्यवस्थेचे चित्र बदलतांना दिसतेय. समाजामध्ये शैक्षणिक पात्रता वाढली शैक्षणिक पात्रता वाढल्यामुळे अर्थार्जनाची पात्रता वाढली आणि प्रगती झाली.. पण ती वैयक्तिक. अशा ह्या वैयक्तिक प्रगतीमुळे एकमेकांनाधील दुरी ही वाढत गेली किंबहुना समाजांतर्गत अंतर वाढत गेले. आज गरज आहे समाजाने एकत्र येऊन समाजव्यवस्थेचा कणा हा टिकवून ठेवायची. ह्याच उद्देशाला समोर ठेऊन एक पाऊल पुढे टाकत समाज सक्षमीकरणाच्या दृष्टीने  वीस ते पंचवीस वर्षानंतर दोनशे लेवा समाजबांधवांनी एकत्र येऊन ह्या स्नेहसंमेलनाचे या सर्व विषयावर चर्चा व मंथन करण्यात आले.

     कार्यक्रमास  उपस्थित असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन अतुल बोरोले यांनी केले.

ज्येष्ठ मार्गदर्शक काशिनाथ बेंडाळे,मार्गदर्शन सुहास बेंडाळे ,सूरज पाचपंडे, प्रशांत बोरोले, संदीप सरोदे,पराग राणे,हर्षल राणे,प्रशांत बोरोले,दिपक भिरूड,कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतुल बोरोले,खिलचंद राणे ,योगेश बेंडाळे, केतन पाचपांडे, कोमल राणे, सुरज पाचपांडे ,गुणवंत राणे , उज्वल राणे, रवींद्र राणे जितेंद्र राणे, अमोल राणे यांनी प्रयत्न केले.,प्रस्ताविक हर्षा केतन पाचपांडे,आभार प्रदर्शन संदीप सरोदे, समीर इंगळे यांनी मानले. यांनी एकदम उत्कृष्ट सुंदर सूत्रसंचालन उज्वल राणेयांनी  करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.समस्त विवरेकर मंडळ यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.