रावेर कल्याण बस मध्ये चढणाऱ्या तरुणीच्या हातातून पर्स लांबवणाऱ्यास अटक
सावदा बसस्थानकावर तरुणीच्या हातातून पर्स लांबवणाऱ्यास अटक
At Savada-Bus-Stand-the one who took the-purse-from-the-hand-of-the-girl-was-arrested.
लेवाजगत न्यूज सावदा -बसमधील गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या हातातील तीन हजारांचा ऐवज असलेली पर्स भामट्याने लांबवली. या प्रकरणी सावदा पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीला अखेर पोलिसांकडून अटक
पांडुरंग नारायण पाटील ,कोचूर तालुका रावेर यांच्या तक्रारीनुसार, सोमवार, १३ रोजी सकाळी ८वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांची मुलगी नम्रता पांडुरंग पाटील ही सावदा बसस्थानक येथून रावेर-कल्याण बसमध्ये चढत असताना संशयित याने तरुणीच्या हातातील पर्स हिसकावली. मुलीने पर्स हिसकावण्यास विरोध केल्याने आरोपीने तरुणीला मारहाण करीत पळ काढला. या पर्समध्ये तीन हजारांची रोकड, पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, एटीएम असा ऐवज होता. सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तपास सपोनि जालिंदर पळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत