Contact Banner

यावल शहरातील एकाची गळफास घेवून आत्महत्या लेकरं बाहेर खेळत होती.. तर इकडे बापाने स्वत:ला संपवलं !

 

लेकरं बाहेर खेळत होती.. तर इकडे बापाने स्वत:ला संपवलं !

यावल शहरातील एकाची गळफास घेवून आत्महत्या

लेकरं बाहेर खेळत होती.. तर इकडे बापाने स्वत:ला संपवलं !

लेवाजगत न्यूज यावल-यावल परिसरात फेटे बांधण्याच्या कामामुळे परिचित असलेल्या एका ३५ वर्षीय तरूणाने त्याची मुलं बाहेर खेळत असतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शिवाजी शामराव गाढे (वय-३५) रा. शिवाजी नगर, यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी गाढे हा पत्नी व मुलांसह यावल शहरातील शिवाजी नगर परिसरात वास्तव्याला होता. पत्नी शेतात कामाला गेलेली होती. मंगळवारी २१ फेब्रुवारी रेाजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवाजी गाढे हा तरूण घरीच होता. त्याची दोन लहान मुले घराबाहे खेळत असतांना राहत्या घरात जावून गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. शिवाजी गाढे याने साधारण दिड वर्षांपुर्वी देखील विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वेळीच उपचार घेतल्याने बचावला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी मयत घोषीत केले. याबाबत मयताचा भाऊ अशोक शामराव गाढे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस विरिक्षक राकेश मानगावकर व पोलीस करीत आहे. शिवाजी गाढे याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुल असे परिवार आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.