यावल येथे दोघांवर ब्लेड ने हल्ला
यावल येथे दोघांवर ब्लेड ने हल्ला
लेवाजगत न्यूज यावल:-शहरातील सुंदर नगरी भागातील दोन तरूणांवर बोरावल गेट भागातील दोघांनी मारहाण केली. त्यांच्यावर ब्लेडने हल्ला केला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सुंदर नगरी भागातील यश राजेंद्र पाटील याने फिर्याद दिली. तो घरासमोर उभा असताना तेथे आलेले ईश्वर गंगाराम भोई व आकाश नामदेव भोई (रा. रा.बोरावल गेट, यावल) यांनी यश व त्याचा मित्र अतुल देविदास चौधरी याला शिवीगाळ करून ब्लेडने दुखापत केली. आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार बागुले करत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत