विहिरीतील मातीचा ढिगारा पडून मजूर झाला गतप्राण
विहिरीतील मातीचा ढिगारा पडून मजूर झाला गतप्राण
लेवाजगत न्यूज हिंगोणा -यावल तालुक्यातील हिंगोणा येथे विहिरीचे खोदकाम करताना मातीचा ढिगारा खाली कोसळला. त्यात खोदकाम करणारा ३५ वर्षीय तरूण दाबला गेला. या घटनेनंतर सहकारी मजुरांनी त्यास तातडीने विहिरीतून बाहेर काढून यावल रुग्णालयात दाखल केले. पण, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. हिंगोणा येथे हुना जयराम चोपडे यांच्या शेतात ( गट क्रमांक ९१७) विहिरीतील गाळ काढणे व खोदकाम सुरू आहे. या विहिरीत मुबारक रमजान तडवी (वय ३५, रा. हिंगोणा) हा खोदकाम करत होता. त्यात मध्यरात्री मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर कोसळला. त्याखाली तो दाबला गेला. इतर मजुरांनी त्याला तातडीने बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात

कोणत्याही टिप्पण्या नाहीत