“गद्दार ताठ मानेने फिरतोय…” सुषमा अंधारे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र
“गद्दार ताठ मानेने फिरतोय…” सुषमा अंधारे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र
वृत्तसंस्था मुंबई-किल्ले शिवनेरी या ठिकाणी शिवजन्माचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. या तिन्ही नेत्यांनी आपल्या भाषणांमधून छत्रपती शिवराय आणि त्यांची दूरदृष्टी यावर भाष्य केलं. त्यानंतर आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचं एक भावनिक पत्र व्हायरल होतं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला माफ करा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी हे पत्र लिहिलं आहे.
काय म्हटलं आहे सुषमा अंधारे यांनी पत्रात?
आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,
आम्हाला माफ करा..आज तुमच्या जन्मदिनी,स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय..
तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय,असे कधीही घडले नाही…पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही,असे वचन आम्ही तुम्हाला देतो..
शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच,फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या!स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या!आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या!
हर हर महादेव !!
तुमचा खरा मावळा,सच्चा शिवसैनिक.
हे पत्र सुषमा अंधारे यांनी लिहिलं आहे. जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. या पत्रातून त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. तर त्यांच्यासोबत गेलेल्यांना ढोंगी कावळे असं म्हटलं आहे. आता या पत्राला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
निवडणूक आयोगाने पक्ष आणि शिवसेना नाव दिलं शिंदे गटाला
निवडणूक आयोगाने शुक्रवारी संध्याकाळी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामध्ये शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंकडे देण्यात आला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे सगळेच नेते आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं आहे.
किल्ले शिवनेरीवर संभाजीराजे आक्रमक
शिवनेरी गडावर गर्दीमध्ये सामान्य शिवभक्तांची अडवणूक झाल्याचे पाहायला मिळालं, त्यामुळे संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी संतप्त शिवभक्तांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केल्या. व्हीआयपी (VIP) लोकांसाठी शिवभक्तांच्या अडवणूक कशासाठी करता? अशी थेट विचारणा त्यांनी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान संभाजीराजे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत त्यांच्या भावना समजावून घेत, आपल्या भावनांशी आम्ही एकरूप असल्याचं म्हटलं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत