वापी गुजरात येथे लेवा पाटील मित्र मंडळ यांचा १८वा वर्धापन दिन सोहळा संपन्न
वापी गुजरात येथे लेवा पाटील मित्र मंडळ यांचा १८वा वर्धापन दिन सोहळा संपन्न
लेवाजगत न्युज वापी:- दिनांक २२/०३/२०२३ रोजी लेवा पाटील मित्र मंडळ, वापी यांचा अठरावा वर्धापन दिन सोहळा खूप उत्साहात आणि जल्लोषात सादर झाला. याप्रसंगी येथे अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते. त्यात उपस्थित मान्यवरांचा सत्कार, मार्गदर्शनपर भाषण, कवितासंग्रहाचे विमोचन, उद्योजक व व्यावसायिकांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम,
बक्षीस समारंभ, व शेवटी आपल्या पारंपारिक भोजन असा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. श्री. प्रशांत फालक, जळगाव येथून तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रवीण झांबरे, भरूच येथून तसेच कार्यक्रमाचे विशेष पाहुणे श्री चित्रांगत खर्चे हे सुद्धा जळगावहून उपस्थित झालेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व गणेश पूजना पासून झाली, त्यानंतर जे गतवर्षी स्वर्गवासी झालेले आहेत. त्यांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली गेली.
कार्यक्रमात पुढे उपस्थित मान्यवरांचा तसेच बाहेर गावाहून आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच साहित्य क्षेत्रात पुरस्कार मिळवलेल्या सौ. शुभांगी सुनील सरोदे यांचा सुद्धा इथं सत्कार करण्यात आला, ह्या शुभ मुहूर्तावर सौ वंदना सुभाष चौधरी यांचा प्रथम कविता संग्रह 'काव्यांदना' चे विमोचन झाले, ह्या कविता संग्रहाचे विमोचन व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रवीण झांबरे, डॉ. श्री प्रशांत फालक, लेवा मित्र मंडळाचे विश्वस्त श्री प्रभाकरदादा बोरोले, मंडळाचे अध्यक्ष श्री भास्कर चौधरी यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यात डॉ. श्री. प्रशांत फालक यांचे विशेष शैलीतून केलेलं मार्गदर्शन कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
दरवर्षी लेवा मित्र मंडळाच्या ह्या प्रसंगी ऐक विशेष कार्यक्रम ठेवला जातो त्यात यावर्षी उद्योजक व व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला, त्यात महिला व्यवसायिका व उद्योजिकांचा सुद्धा सहभाग होता.
नेहमीच कार्यक्रमाचे आकर्षण ठरणारा सांस्कृतिक कार्यक्रम यानंतर झाला त्यात नृत्य व नाटिकाचे सादरीकरण झाले, मग गुणी व हुशार विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह (ट्रॉफी) व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, शेवटी कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने झाली. अशा या कार्यक्रमाचे दर्जेदार सूत्रसंचालन श्री विकास महाजन व सौ वंदना चौधरी यांनी केले.
नंतर सर्वांनी आपल्या लेवा पारंपारिक भोजनाचा म्हणजे वरण-बट्टी वांग्याची भाजी, जिलेबी चा मनःपूर्वक आस्वाद घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत